नवी दिल्ली: २२ जानेवारी २०२४मध्ये राम मंदिरात(ram temple) भगवान रामाची प्राण प्रतिष्ठा कार्यक्रम आहे. त्याआधी ३० डिसेंबर २०२३ला पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येत कनेक्टिव्हिटीशी संबंधित अनेक प्रोजेक्ट्स सुरू करत आहेत यात नव्या एअरपोर्टच्या उद्घाटनाचा कार्यक्रम सामील आहे. याशिवाय ते अयोध्येत रेल्वे स्टेशनसह अमृत भारत ट्रेनशिवाय सहा नव्या वंदे भारत रेल्वेंना हिरवा झेंडा दाखवतील.
३० डिसेंबर २०२३ला पंतप्रधान मोदींचा अयोध्या दौऱ्याचा कार्यक्रम आहे. सकाळी सवाअकरा वाजता ते अयोध्येत रीडेव्हलप केलेल्या रेल्वे स्टेशनचे उद्घाटन करतील. येथे ते दोन नव्या अमृत भारत आणि सहा नव्या वंदे भारत रेल्वेंना हिरवा झेंडा दाखवतील. याशिवाय ते दुसरे रेल्वे प्रोजेक्टसह राष्ट्राला समर्पित करतील.
अयोध्या रेल्वे स्टेशन जे अयोध्या धाम जंक्शन म्हटले जाणार आहे हे स्टेशन २४० कोटी रूपये खर्च करून बनवण्यात आले आहे. येथे लिफ्ट, एसक्लेटर, फूड प्लाझा, पुजेच्या साहित्याचे दुकान, क्लाक रूम, चाईल्ड केअर रूम, वेटिंग हॉल या सर्व प्रकारच्या आधुनिक सुविधा आहेत. पंतप्रधान मोदी या रेल्वे स्टेशनवरून दोन अमृत भारत रेल्वेला हिरवा झेंडा दाखवतील.
पीएम मोदी सहा नव्या वंदे भारत रेल्वेंना हिरवा झेंडा दाखवतील. या सहा नव्या वंदे भारत ट्रेनमध्ये श्री माता वैष्णव देवी कटरा- नवी दिल्ली, अयोध्या-आनंद विहार टर्मिनल वंदे भारत, अमृतसर-दिल्ली वंदे भारत, कोईम्बतूर-बंगळुरू केंट वंदे भारत, मंगळुरू-मडगाव वंदे भारत, जालना-मुंबई वंदे भारत यांचा समावेश आहे.
या दिवशी सवा बारा वाजता पंतप्रधान मोदी अयोध्येत तयार करण्यात आलेल्या नव्या विमानतळाचे उद्घाटन करतील.






