नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी आता मणिपूर ते मुंबई अशी ‘भारत न्याय यात्रा’ काढणार आहेत. ही यात्रा भारत जोडो यात्रेच्या धर्तीवर असणार आहे. ही यात्रा १४ जानेवारीपासून सुरू होणार असून २० मार्चपर्यंत सुरू राहील.
काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी बुधवारी या यात्रेची घोषणा केली. पत्रकार परिषदेत वेणुगोपाल म्हणाले, “राहुल गांधींनी पूर्व ते पश्चिम अशी एक यात्रा काढावी असे मत काँग्रेस कार्यकारिणी समितीने २१ डिसेंबर रोजी मांडले होते.
“राहुल गांधी यांनीही काँग्रेस कार्यकारिणीचे मत मान्य करत ही यात्रा काढण्यास सहमती दर्शवली. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने १४ जानेवारी ते २० मार्च दरम्यान मणिपूर ते मुंबई अशी ‘भारत न्याय यात्रा’ काढण्याचा निर्णय घेतला आहे,” असे वेणुगोपाल यांनी सांगितले.
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज कोलकाता नाईट रायडर्सची टक्कर गुजरात टायटन्सशी होत आहे. हा…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये सोमवारी कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना रंगत…