Vijayakanth Passed Away : डीएमडीकेचे संस्थापक आणि अभिनेते विजयकांत यांचं कोरोनामुळे निधन

वयाच्या ७१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास



चेन्नई : लोकप्रिय तमिळ अभिनेते (Tamil actor) व तामिळनाडू (Tamilnadu) विधानसभेतील माजी विरोधी पक्षनेते विजयकांत (Vijayakanth) यांचं आज सकाळी चेन्नईतील एमआयओटी हॉस्पिटलमध्ये (MIOT Hospital) निधन झालं. वयाच्या ७१व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. २० नोव्हेंबरपासून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या मृत्यूनंतर रुग्णालयाबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे.


विजयकांत तामिळनाडूतील डीएमडीके पक्षाचे (DMDK Party) प्रमुख होते. ते काही दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह (Corona Positive) आले होते. यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कोविड-१९ चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना श्वास घ्यायला त्रास होत असल्याने ते व्हेंटिलेटर सपोर्टवर होते, असं सांगितलं जात आहे. मात्र, रुग्णालयाच्या निवेदनात त्यांना न्यूमोनिया झाल्याचं नमूद करण्यात आलं आहे. त्यामुळे त्यांच्या मृत्यूचं नेमकं कारण रुग्णालयाने स्पष्ट केलेलं नाही.



कॅप्टन विजयकांत डीएमडीके पक्षाचे नेते


अभिनेते विजयकांत यांनी २००५ मध्ये देसिया मुरपोक्कू द्रविड कळघम (DMDK) पार्टीची स्थापना केली. २००६ मध्ये विजयकांत यांच्या पक्ष डीएमडीकेने तामिळनाडूतील सर्व २३४ जागांवर निवडणूक लढवली होती. मात्र विजयकांत एकटेच निवडणूक जिंकण्यात यशस्वी ठरले. उर्वरित सर्व जागांवर त्यांच्या पक्षाच्या उमेदवारांना पराभवाला सामोरे जावे लागले. मात्र, या निवडणुकीत त्यांच्या पक्षाला ८.३८% मते मिळाली.


२०११ च्या विधानसभा निवडणुकीत डीएमडीकेला अधिक यश आलं. ४१ जागांपैकी २९ जागा पार्टीला मिळाल्या होत्या. २०११ ते २०१६ पर्यंत डीएमडीके तामिळनाडूमध्ये मुख्य विरोधी पक्ष होता आणि विजयकांत विधानसभेतील विरोधी पक्षनेते होते. मात्र, त्यानंतर २०१६ आणि २०२१ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाला एकही जागा जिंकता आली नाही.


विजयकांत यांचा सिनेप्रवास


विजयकांत यांनी १५४ सिनेमांत आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. चेन्नईत विजयकांत यांचं एक इंजीनियरिंग कॉलेज आणि कोयम्बेडु नावाचा लग्नाचा हॉल आहे. अभिनेते असण्यासोबत ते निर्माता आणि दिग्दर्शकही होते. अष्टपैलू भूमिकांसोबतच अॅक्शन हिरो म्हणूनही ते लोकप्रिय होते. विजयकांत यांचे अनेक सिनेमे ब्लॉकबस्टर ठरले आहेत. फिल्मफेअर पुरस्कासह अनेक नामांकित पुरस्कारांनी त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.


विजयकांत यांनी 'इनिक्कुल इलामाई' या सिनेमाच्या माध्यमातून १९७९ रोजी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. या सिनेमात त्यांनी विरोधी भूमिका साकारली होती. एमए काजा यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. विजयकांत यांचे आगल विलक्कू, नीरोत्तम आणि सामंथिप्पू हे सिनेमे बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले आहेत. तर नूरवथु नाल, वैदेगी काथिरुंथाल, कूलिएकरन, वीरन, वेलुथांबी, उझवान मगन हे सिनेमे सुपरहिट ठरले आहेत.

Comments
Add Comment

One Day One University Scheme : Gen Z सोबत थेट संवाद साधणार केंद्र सरकार; केंद्रीय मंत्र्यांची विद्यापीठांमध्ये भेट, ‘एक दिवस, एक विद्यापीठ’ योजनेची चर्चा

नवी दिल्ली : देशातील तरुण पिढी, विशेषतः Gen Z सोबत थेट संवाद वाढवण्यासाठी केंद्र सरकारकडून नवा उपक्रम राबवण्याची

Indian Navy MQ-9B Sea Guardian : चीनवर नजर ठेवण्यासाठी भारताची मोठी तयारी; अमेरिकेकडून ३० महिन्यांसाठी दोन अत्याधुनिक MQ-9B Sea Guardian ड्रोन लीजवर

नवी दिल्ली : हिंद महासागर क्षेत्रातील समुद्री निगराणी क्षमता आणखी मजबूत करण्यासाठी भारताने मोठे पाऊल उचलले आहे.

Pakistan High Commission in Delhi : दिल्लीतील पाकिस्तान उच्चायोगाबाहेरील अनधिकृत बांधकामांवर कारवाई; बॅरिकेड्स आणि ट्रॅफिक बोलार्ड्स हटवले

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील पाकिस्तान उच्चायोगाबाहेर उभारण्यात आलेली अनधिकृत बांधकामे आणि रांगेचे

Free Online Coaching for Competitive Exams : स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी मोफत ऑनलाइन कोचिंग; केंद्रीय शिक्षणमंत्र्यांकडून आढावा

नवी दिल्ली : स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या देशभरातील तरुणांना मोफत ऑनलाइन कोचिंग उपलब्ध करून देण्याच्या

STF arrests ISI-linked : आयएसआयशी संबंधित पाकिस्तानी नागरिकाच्या तिसऱ्या स्थानिक साथीदाराला बंगाल एसटीएफकडून अटक

कोलकाता : पश्चिम बंगाल पोलिसांच्या विशेष कार्यदलाने (एसटीएफ) पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयशी संबंध

US Ambassador : जम्मू- काश्मीर हा भारताचा एक महत्त्वाचा भाग- सर्जिओ गोर

श्रीनगर : अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांनी बुधवारी (१९ ऑगस्ट) श्रीनगरमध्ये जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर