Friday, October 17, 2025
Happy Diwali

काँग्रेसला लागलेत भीकेचे डोहाळे!

काँग्रेसला लागलेत भीकेचे डोहाळे!

पक्षनिधीसाठी लावले रॅलीतील प्रत्येक खुर्चीला क्युआर कोड

नागपूर : काँग्रेस (Congress) हा देशातील सर्वात जुना पक्ष आहे. याच काँग्रेसचा आज २८ डिसेंबर रोजी १३९ वा स्थापना दिवस साजरा केला जात आहे. देशातील सर्वात जुना पक्ष आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळात सर्वाधिक सत्तेचा उपभोग घेतलेल्या काँग्रेसला भीकेचे डोहाळे लागल्याचे दिसून येते. सत्ता असताना काँग्रेस नेत्यांनी देशाला मिळेल तसे ओरबाडून खाल्ले. भ्रष्टाचाराची परिसीमा गाठली. त्याचा परिणाम म्हणून दहा वर्षापूर्वी जनतेने काँग्रेसला धडा शिकवला. सत्तेवरुन पायउतार झाल्यानंतरही भाजपा सरकारच्या हुकूमशाहीला काँग्रेस भीक घालत नाही, अशी उर्मट भाषा काँग्रेसचे नेते बोलत होते. येनकेन प्रकारे मोदी सरकारची कोंडी करण्याचा केविलवाणा प्रयत्न काँग्रेसच्या नेत्यांनी केला. मात्र तेथे काँग्रेसची डाळ शिजू शकली नाही. भ्रष्टाचारामुळे काँग्रेस पक्षाची प्रतिमा पार रसातळाला गेली आहे. आज कोणीही काँग्रेसला मदतीचा हात पुढे करायला तयार नसल्याने काँग्रेसची अर्थव्यवस्था देखिल पार कोलमडली आहे. त्यामुळे कोणीही मदतीला धावून येत नसल्यामुळे सध्या काँग्रेसला भिकेचे डोहाळे लागले आहेत.

आज काँग्रेसचा १३९ वा स्थापना दिवस कार्यक्रम नागपूरमध्ये आयोजित करण्यात आला आहे. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाकडून ‘है तयार हम’ ही महारॅली काढण्यात येणार आहे. या महारॅलीच्या मैदानावर ठिकठिकाणी पोस्टर्स लावण्यात आले आहेत. या पोस्टर्सवर काँग्रेस पक्षाला तुम्ही निधी द्या, असं आवाहन लोकांना करण्यात आलं आहे. यासाठी मैदानावरील प्रत्येक खुर्चीच्या पाठीमागे क्यूआर कोड लावण्यात आला आहे. www.donet.inc.in या काँग्रेस पक्षाच्या वेबसाईटवर हे डोनेशन पाठवण्यासाठी या पोस्टर्समधून आवाहन करण्यात आले आहे.

त्यामुळे हे स्पष्ट दिसत आहे की, काँग्रेस केवळ भाषण करून किंवा कार्यक्रम आयोजित करून लोकसभा निवडणुकीची तयारी करत नाही. तर ते लोकसभेच्या निवडणुकीसाठी निधीदेखील गोळा करत आहेत. या महारॅलीमध्ये असंख्य लोक येणार आहेत. जे या डोनेशनच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाला किती प्रमाणात निधी देणार? हे आगामी काळात समोर येईल. पण अगदीच भीकेला लागलेला काँग्रेस पक्ष आगामी निवडणूक कशा लढवणार, याबाबतच्या चर्चा आता चांगल्याच रंगल्या आहेत.

याआधी, १९ डिसेंबर रोजी नवी दिल्ली येथे, इंडिया आघाडीच्या (INDIA Alliance) बैठकीनंतर जेडीयू खासदार सुनील कुमार पिंटू (Sunil Kumar Pintu) यांनी बैठकीत समोसा नसल्याने जाहीर नाराजी व्यक्त केली होती.

त्यावेळी ते म्हणाले होते की, 'काँग्रेस म्हणत आहे की, त्यांच्याकडे निधीची कमतरता आहे. पक्षाकडे फंड नाही. लोकांनी देणगी द्यावी, ते १३८ रुपये, १३८० रुपये किंवा १३,८०० रुपये देणगी मागत आहेत. त्यामुळे मंगळवारची मीटिंग केवळ चहा-बिस्किटांवर संपली, या बैठकीत समोसा दिला नाही.' असे सांगत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती.

त्याचबरोबर अशी देखील चर्चा यानिमित्ताने सुरू झाली आहे की, काँग्रेस हा देशातील सर्वात जुना पक्ष आहे. या पक्षाची केंद्रात, अनेक राज्यात अनेक वर्ष सत्ता राहिली आहे. परंतु गेल्या दहा वर्षांपासून या पक्षाची राजकीयदृष्ट्या पिछेहाट झाली आहे. त्याचबरोबर आता या पक्षाला निधीची चणचण भासू लागली आहे. काँग्रेसची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी आता 'है तयार हम' हे कॅम्पेन सुरू केले असल्याचे सांगण्यात येत आहे. काँग्रेसला कॉर्पोरेट क्षेत्राकडून पक्ष निधी मिळत नसल्याने हे कॅम्पेन राबविण्यात येत असल्याचे देखिल बोलले जात आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा