रणबीरने ‘जय माता दी’ म्हणत केलं असं काही, की नेटकरी संतापले…
मुंबई : बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर (Bollywood Actor Ranbir Kapoor) सध्या ‘अॅनिमल’ (Animal) या चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. त्याचा हा सिनेमा ५०० कोटींहून अधिक कमाई करत प्रचंड यशस्वी झाला आहे. त्यातच त्याने ख्रिसमसच्या (Christmas) दिवशी त्याची मुलगी राहाला (Raha Kapoor) पहिल्यांदा पॅपराझींसमोर आणलं. राहाचा गोंडस अंदाज सोशल मीडियावर (Social Media) प्रचंड व्हायरल होत आहे. त्यामुळेही रणबीर चर्चेत आला आहे. पण याचसोबत आता रणबीर अडचणीत सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
अभिनेता रणबीर कपूरने आपल्या कुटुंबासोबत ख्रिसमस साजरा केला. याचे फोटोज आणि व्हिडीओज सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यामुळे सोशल मीडियावर सध्या कपूर कुटुंबच जास्त दिसत आहे. यातील ख्रिसमस साजरा करतानाची रणबीरची एक कृती चाहत्यांच्या आवडली नसून त्याविषयी त्यांनी संताप व्यक्त केला आहे. इतकंच नव्हे तर त्याच्या या कृतीविरोधात घाटकोपर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
View this post on Instagram
रणबीर कपूर ख्रिसमस सेलिब्रेशनच्या या व्हिडिओमध्ये जय माता दी असं म्हणतो. या यानंतर तो केकवर दारू ओततो आणि त्याला आग लावतो. नेटिझन्सना त्याची ही कृती अजिबात आवडली नाही. रणबीरवर धार्मिक भावना (Religious sentiments) दुखावल्याचा आरोप होत आहे. याशिवाय सोशल मीडियावरही त्याला खूप ट्रोल केले जात आहे.
रणबीरविरोधात काल मुंबईतील घाटकोपर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. तथापि, या प्रकरणात अद्याप कोणताही प्रथम माहिती अहवाल (FIR) दाखल करण्यात आलेला नाही. वकील आशिष राय आणि पंकज मिश्रा यांच्यामार्फत संजय तिवारी यांनी घाटकोपर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
Complaint filed against actor #RanbirKapoor at Ghatkopar police station in #Mumbai for “hurting religious sentiments”. Complainant Sanjay Tiwari claimed that in a viral video the actor is seen pouring liquor on cake & setting it on fire while saying “Jai Mata Di”. No FIR as yet pic.twitter.com/T2Kb6zciRu
— News The Truth (@NewsTheTruthh) December 28, 2023
काय आहे तक्रार?
पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, हिंदू धर्मात इतर देवतांचे आर्जव करण्यापूर्वी अग्निदेवतेचे आवाहन केले जाते, परंतु कपूर आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी जाणूनबुजून अमली पदार्थाचा वापर केला आणि दुसर्या धर्माचा सण साजरा करताना जय माता दीचा नारा दिला. यामुळे धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत.