
अजितदादांनंतर हसन मुश्रीफांनीही केला अमोल कोल्हेंविषयी गौप्यस्फोट
मुंबई : एक अभिनेता असल्यामुळे राजकीय गोष्टींचा परिणाम होऊन त्यांच्या सिनेमाच्या आर्थिक गोष्टी बिघडत आहेत, सिनेमा चालत नाही म्हणून मी खासदारकीचा राजीनामा देणार असल्याचं ते मला म्हणाले होते, असं नाव न घेता अमोल कोल्हेंविषयी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) याआधी म्हणाले होते. आता तर अजित पवार यांनी पुणे दौऱ्यावेळी पत्रकारांशी बोलताना खासदार अमोल कोल्हेंविरोधात (Amol Kolhe) आमचा उमेदवार उभा करणार आणि कोल्हेंना शिरुर मतदारसंघात पाडणार म्हणजे पाडणारच असं वक्तव्य केलं.
यानंतर आता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी देखील अमोल कोल्हेंविषयी मोठा गौप्यस्फोट केला आहे. 'मी पुन्हा निवडणूक लढवणार नाही', असं खासदार अमोल कोल्हे यांनी मला अनेकदा सांगितलं आहे. माझ्यावर शरद पवार आणि राष्ट्रवादीचा शिक्का बसला आहे. खासदारकीचा परिणाम माझ्या कामावर होतोय. झक मारली खासदार झालो; यांच्यामुळे माझ्या सिनेकरिअरला ब्रेक लागला, असं ते मला अनेकदा खासगीत म्हणाले आहेत, असं मंत्री हसन मुश्रीफ यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.