Sunday, March 23, 2025
Homeब्रेकिंग न्यूजराम मंदिर आणि ९३च्या दंगलीत उद्धव ठाकरेंचे योगदान काय?

राम मंदिर आणि ९३च्या दंगलीत उद्धव ठाकरेंचे योगदान काय?

एक तरी फोटो दाखवा, भाजप आमदार नितेश राणे यांचे ओपन चॅलेंज

मुंबई : श्री राम मंदिर उद्धाटन (Ram Mandir) सोहळ्याला उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) निमंत्रण न देण्याचा राम मंदिर समितीचा निर्णय योग्य आहे. मंदिर समितीच्या निर्णयाचे मी स्वागत करतो. हिंदू समाजाचा आणि उद्धव ठाकरेंचा काहीही संबंध नसल्याची घणाघाती टीका भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केली आहे.

श्री राम मंदिराला उद्धव ठाकरेंचे काहीही योगदान नाही. आणि कोणी उद्धव ठाकरेंचे १९९३च्या दंगलीत काही योगदान असल्याचे सांगत असतील तर त्यांनी त्या दंगलीतला उद्धव ठाकरेंचा एक पुरावा, एक फोटो आणून द्यावा असे ओपन चॅलेंज यावेळी नितेश राणे यांनी त्यांचा कामगार संजय राजाराम राऊतांना दिले आहे.

नितेश राणे म्हणाले की, ज्याच्यावर एक साधा एफआयआर नाही, एक एनसी नाही, त्या उद्धव ठाकरेला राम मंदिराच्या कार्यक्रमाला का बोलवायचे? हा फार मोठा प्रश्न आहे. आम्ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे योगदान, विश्व हिंदू परिषदेचे योगदान, राष्ट्रीय स्वयंसेवकांचे योगदानाबद्दल कोणाचेही दुमत नाही. पण विषय असा आहे की, ज्या उद्धव ठाकरेंचा राम मंदिर आणि अयोध्येशी काडीमात्र संबंध नाही, त्याला मंदिराच्या कार्यक्रमाला फोटो काढण्यासाठी फोटोग्राफर म्हणून का बोलवायचे? असाही सवाल त्यांनी केला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -