Friday, July 19, 2024
Homeताज्या घडामोडीSalman Khan Birthday:सलमान खानचा बर्थडेनिमित्त जल्लोष, बॉबी देओलने गालावर किस देत दिल्या...

Salman Khan Birthday:सलमान खानचा बर्थडेनिमित्त जल्लोष, बॉबी देओलने गालावर किस देत दिल्या शुभेच्छा

मुंबई: सुपरस्टार सलमान खान आज आपला ५८वा वाढदिवस साजरा करत आहे. या निमित्ताने त्याचे कुटुंब, चाहते आणि बॉलिवूडचे सर्व सेलिब्रेटींकडून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सलमान खानने आपली बहीण अर्पिता खान शर्माची मुलगी आयतसोबत आपला वाढदिवस साजरा केला आहे. गेल्या रात्री त्याने आपली भाची, मित्र परिवास आणि कुटुंबासोबत वाढदिवस साजरा केला.

केक कापत केले सेलिब्रेशन

आपल्या ५८व्या वाढदिवशी सलमान खानने आपल्या भाचीसह केक कापत जल्लोष केला. तर सलमान खानच्या वाढदिवसाच्या जल्लोषाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये बॉलिवूडचा सुलतान आपले जवळचे मित्र आणि कुटुंबासोबत स्पेशल डे सेलिब्रेट करताना दिसत आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Manav Manglani (@manav.manglani)

सलमान खानच्या बर्थडे पार्टीत लिलूया वंतूर, अरबाज खान, अरहान खान, हेलेन, अलवीरा खान अग्निहोत्री, आयुष शर्मा, अर्पिता खान शर्मा, बॉबी देओलसह अनेक सेलिब्रेटी उपस्थित होते. सलमान खानच्या बर्थडेचा जल्लोष स्टार स्टडेड अफेयरपेक्षा कमी नव्हते.

बॉबी देओलने सलमान खानसोबत शेअर केला फोटो

अॅनिमल अभिनेता बॉबी देओलने सलमान खानच्या बर्थडे सेलिब्रेशनचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोत बॉबी देओल सलमान खानच्या गालावर किस करताना दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोत अभिनेत्याने कॅमेऱ्यासमोर पोज देत सलमानच्या खांद्यावर हात ठेवला आहे.
.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -