
मुंबई: क्रिकेटच्या मैदानावर जेव्हा ही भारत(india) आणि पाकिस्तानचा(pakistan) संघ आमनेसामने येतो तेव्हा चाहत्यांच्या नजरा या सामन्याकडे असतात. क्रिकेट जगतात आतापर्यंत भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना सगळ्यात पॉप्युलर सामना मानला जात होता. मात्र आयसीसीच्या रिपोर्टने हे चित्र आता बदलले आहे.
खरंतर आयसीसीने वनडे वर्ल्डकप २०२३चा एक रिपोर्ट जारी केला आहे. यात एका सामन्याला तब्बल एक ट्रिलियन व्ह्यू मिळाले आहेत. यानुसार डिजीटल प्लॅटफॉर्मवर एकूण १६.९ बिलियन व्ह्यूज आले आहेत. आयसीसीच्या एखाद्या इव्हेंटमधील हा रेकॉर्ड आहे.
विश्वचषकात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंतिम सामन्याला सर्वाधिक म्हणजेच ५९ मिलियन व्ह्यूज मिळाले. हा अंतिम सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला होता.
दुसऱ्या स्थानावर भारत आणि न्यूझीलंड सेमीफायनल सामना होता. या सामन्याला ५३ मिलियन व्ह्यूज मिळाले होते.
तिसऱ्या स्थानावर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना होता. या सामन्याला ४४ मिलियन व्ह्यूज मिळाले होते.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात अहमदाबादमध्ये सामना खेळवला गेला होता. हा सामना भारताने जिंकला होता. या सामन्याला ३५ मिलियन व्ह्यूज मिळाले होते. व्ह्यूजच्या यादीत हा सामना पाचव्या स्थानावर आहे.