Wednesday, July 17, 2024
Homeताज्या घडामोडीGautami Deshpande: अभिनेत्री मृण्मयी देशपांडेचे लहान बहिणीसाठी खास पत्र, वाचून व्हाल भावूक

Gautami Deshpande: अभिनेत्री मृण्मयी देशपांडेचे लहान बहिणीसाठी खास पत्र, वाचून व्हाल भावूक

मुंबई: मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री मृण्मयी देशपांडे(mrunmayee deshpande) हिची लहान बहीण गौतमी देशपांडे हिचा विवाहसोहळा नुकताच पार पडला. मोठ्या धूमधडाक्यात तिच्या विवाहाचे सर्व विधी पार पडले. मृण्मयीप्रमाणेच गौतमीनेही या सिनेसृष्टीत आपले दमदार पाऊल ठेवले आहे.

गौतमीच्या लग्नानंतर मृण्मयीने आपले शेपूट असलेल्या लहान बहिणीला खास पत्र लिहिले आहे. यात तिने आपल्या लहान बहिणीसाठी भावूक करणारे असे हे पत्र आहे. यात तिने गौतमीबद्दलच्या आपल्या भावना शब्दात मांडल्या आहेत. तसेच मोठी बहीण म्हणून सल्लाही दिला आहे तसेच तिची काळजीही व्यक्त केली आहे.

 

पाहा काय म्हणाली मृण्मयी आपल्या पत्रात…

अजूनही विश्वास बसत नाहीये की गौतमीचं लग्न झालं… प्रत्येक गोष्टीमध्ये ताई हवी असणारी माझी बहीण स्वतःच्या संसाराला लागली… या क्षणी नक्की काय वाटतंय ते शब्दात सांगता येत नाहीये… आनंद..काळजी..आता ती officially दुसऱ्याची झाली याचं दुःख.. आणि तिच्या मनासारखा जोडीदार मिळाल्याचा आनंद.. सगळ्याच भावना एकत्र आल्या आहेत… काल परवा पर्यंत ताईचे शेपूट असणार आमचं बाळ ‘संसार’ करताना बघणं मजेचं असणार आहे.. यापुढे आम्हा बहिणींची gossips एकतर्फी नसतील 😁 आणि कदाचित तिचा संसार सुरू झाल्यावर ,”ताई तुला माझ्यासाठी वेळच नसतो..” ही तिची तक्रार संपेल… कारण..? तिचं तिलाच कळेल!
स्वानंद.. तुझं वेगळं स्वागत करण्याची गरज नाहीये… लग्नाआधीच तू फॅमिली मेंबर झाला होतासच… गौतमी स्वानंद ची काळजी घे… स्वानंद गौतमची साथ सोडू नकोस… संसार कोणाचाच सोपा नसतो.. पण एक दुसऱ्याचा हात घट्ट पकडलेला असला की कुठल्याही अडचणी वरती मात करता येते.. कदाचित सहज नाही… पण मात करता येते!! एकमेकांवर विश्वास असू द्या… संवाद असू द्या… नातं किंवा प्रेम असंच टिकत नाही त्यासाठी दोघांनीही कष्ट घेण्याची गरज असते… एकमेकांच्या प्रेमात पडण्याची नवीन कारणं शोधत रहा… एकमेकांना सांभाळून घ्या… आता फक्त तुम्ही दोघं नाही आहात दोन्ही कुटुंब एकत्र आली आहेत.. सगळ्यांची काळजी घ्या… आणि मी एवढं प्रेमाने बोलून सुद्धा, एवढं छान लिहून सुद्धा वेड्यासारखे वागलात, तर गाठ माझ्याशी आहे हे लक्षात ठेवा!!!! लै हनीन 😁😁

गौतमी देशपांडे ही मृण्मयीची सख्खी लहान बहीण आहे. ती एक अभिनेत्री असून गायिकाही आहे. तिने माझा होशील ना या मालिकेद्वारे मालिकाविश्वात पदार्पण केले होते. यात तिने सईची भूमिका साकारली होती. २०२०-२१मध्ये आलेल्या या मालिकेतील सई-आदित्यच्या जोडीला प्रेक्षकांनी खूप प्रेम दिले होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -