
नवी दिल्ली : भारतात कोरोना (Corona) रुग्णांमध्ये वाढ (Covid-19) होताना दिसत आहे. देशात गेल्या २४ तासांत कोरोना व्हायरसचे (Corona Virus) ६२८ नवीन रुग्ण सापडले आहेत. यातील बहुतेक रुग्ण नव्या JN.1 सब-व्हेरियंटचे असल्याने प्रशासन चिंतेत आहे. यामुळे सक्रिय कोरोनाच्या रुग्णांची संख्या ४०५४ झाली आहे, या रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत.
कर्नाटकातही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कर्नाटकात गेल्या २४ तासांत ७४ नवीन कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यासोबतच दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. कर्नाटकातील सक्रिय रुग्णांची संख्या ४६४ झाली असून मृतांची संख्या ९ वर पोहोचली आहे.
सध्या ख्रिसमस पार्ट्या, ३१ डिसेंबर आणि नववर्षाच्या निमित्ताने होणा-या गर्दीमुळे कोरोनाचा धोका आणखी वाढला आहे. नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत आणि त्यासोबतच कोरोनाच्या नवीन व्हेरियंटमुळे चिंता आणखी वाढली आहे.