Thursday, October 30, 2025
Happy Diwali

लष्करांवर नागरिकांची मने जिंकण्याची जबाबदारी : राजनाथ सिंह

लष्करांवर नागरिकांची मने जिंकण्याची जबाबदारी : राजनाथ सिंह

नवी दिल्ली : भारतीय लष्करावर केवळ देशाला शत्रूंपासून बचाव करण्याची जबाबदारी नाही तर नागरिकांची मने जिंकण्याचीही जबाबदारी आहे. त्यामुळे पूंछमध्ये घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घ्या, असे आवाहन बुधवारी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केले. जम्मूा-काश्मीरमधील राजौरी येथे जवानांशी संवाद साधताना बोलत होते.

जम्मू-काश्मीरमध्ये पुंछमध्ये नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राजनाथ सिंह आज जम्मू -काश्मीर दौऱ्यावर आहेत. राजौरी येथे बोलताना ते म्हणाले की, “आम्ही युद्ध जिंकू आणि दहशतवादाचा नायनाटही करू. सर्व नागरिकांची मने जिंकण्यासाठी आम्ही प्रयत्न करु याची आपण खात्री बाळगा. तुमच्या सर्वांच्या खांद्यावर खूप मोठी जबाबदारी आहे.”

जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवाद संपला पाहिजे. दहशतवादाचा नायनाट करण्याच्या वचनबद्धतेसह पुढे वाटचाल करा, असेही राजनाथ सिंह यांनी सांगितले. यावेळी त्यांनी पुंछ जिल्ह्यात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात मारल्या गेलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. २१ डिसेंबर रोजी पूंछमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारतीय सुरक्षा दलाचे ४ जवान शहीद झाले होते. दहशतवादी हल्ल्यानंतर २२ डिसेंबर रोजी भारतीय सुरक्षा दलाने शोध मोहिम राबवली होती. त्यावेळी ३ नागरिकांना सुरक्षा दलाच्या जवानांकडून चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर तिघांचाही मृत्यू झाला. तिन्ही मृतांच्या नातेवाईकांची आज राजनाथ सिंह यांची भेट घेतली.

Comments
Add Comment