Ajit Pawar : अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया त्यांनाच लखलाभ, मी काल जे सांगितलं तेच फायनल!

अजित पवार सकाळीच पोहोचले कोल्हेंच्या मतदारसंघात


शिरुर : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी काल राष्ट्रवादी शरद पवार गटाचे (NCP Sharad Pawar Group) खासदार आणि अभिनेते अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्याबाबत अनेक खुलासे करत त्यांच्या शिरुर मतदारसंघात त्यांना पाडणार म्हणजे पाडणारच, असं वक्तव्यं केलं होतं. त्यानंतर आज सकाळीच अजित पवार शिरुर मतदारसंघाची पाहणी करायला गेले. त्यांच्या या लगेचच्या दौर्‍यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली. मात्र, हा दौरा पूर्वनियोजित होता, त्याचा कालच्या वक्तव्याशी काही संबंध नाही, असं अजित पवारांनी स्पष्ट केलं आहे.


अजित पवार काल अमोल कोल्हे यांचं नाव न घेता म्हणाले होते की, त्यांचे चित्रपट चालत नसल्याने त्याचा परिणाम त्यांच्या आर्थिक परिस्थितीवर होत होता, ही गोष्ट त्यांनी आम्हाला बोलून दाखवली होती. त्यासाठी ते राजीनामा देणार होते. त्यांना निवडून आणण्यासाठी मी आणि दिलीप वळसे पाटलांनी जिवाचं रान केलं होतं. पण यावेळी आमचा उमेदवार उभा करुन त्यांना पाडणार म्हणजे पाडणारच, असं अजित पवार म्हणाले होते.


या वक्तव्यानंतर आज सकाळीच अजित पवार कोल्हेंच्या शिरुर मतदारसंघाची पाहणी करायला गेले होते. याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता, 'आपला हा दौरा पूर्वनियोजित होता. अमोल कोल्हेंना दिलेल्या आव्हानाचा आणि दौऱ्याचा संबंध नाही', अशी प्रतिक्रिया यावेळी त्यांनी दिली. त्याचबरोबर, अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया आली असेल तर त्यांना ती लखलाभ, मी काल जे सांगितलं तेच फायनल आहे, असंही अजित पवार यावेळी म्हणाले.

Comments
Add Comment

Pune Traffic Alert: पुणेकरांनो, आज घराबाहेर पडताना सावधान! महामोर्चामुळे ‘या’ मार्गांवर वाहतूक बंद; जाणून घ्या पर्यायी रस्ते

पुणे : पुणेकरांसाठी आजचा दिवस वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे. आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधात

Jalna : कॉलेजचा स्लॅब कोसळून एकाचा मृत्यू आणि चौघे जखमी

जालना : जालना जिल्ह्यातील भोकरदनमध्ये एका कॉलेजच्या नव्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. हे बांधकाम सुरू असताना

Ahilyanagar Crime News : अल्पवयीन मुलीचे अपहरण करून अत्याचार, मुकादमाच्या मुलावर गुन्हा दाखल

Ahilyanagar Crime News : अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात एक संतापजनक घटना घडली आहे. पाथर्डी तालुक्यातील एका गावातील

Pune News : पुणे स्थानकातून प्रवाशांची अजब हातसफाई : ५ वर्षांत ३ कोटींचे बेडशीट अन् टॉवेल लंपास; रेल्वेने ठेकेदाराकडून वसूल केली भरपाई!

पुणे : रेल्वेच्या वातानुकूलित (AC) डब्यातून प्रवास करताना प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी रेल्वे

Pratap Sarnaik : गौरी-गणपतीसाठी कोकणात एसटीच्या ५,२२० जादा बसेस धावणार

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक मुंबई :  श्री गणरायाचे आगमन १४ सप्टेंबर रोजी होत असून, बाप्पाच्या स्वागतासाठी

Devendra Fadnavis : तिसऱ्या मुंबईसाठी ३२४ चौ.कि.मी. क्षेत्राचा 'मास्टर प्लॅन'

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; रायगड-पेण ग्रोथ सेंटरमध्ये 'मॅपलट्री'कडून १.१ अब्ज डॉलरची गुंतवणूक अपेक्षित मुंबई :