नवी दिल्ली: भारताचे दिग्गद कुस्तीपटू आणि कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्यातील वाद सुरूच आहे. यातच कुस्तीपटू विनेश फोगाटने आपले पुरस्कार परत करण्याची घोषणा केली आहे.
विनेश फोगाटने लिहिले, माननीय पंतप्रधान साक्षी मलिकने कुस्ती सोडली आहे आणि बजरंग पुनियाने आपला पद्मश्री परत केला आहे. तुम्ही तर देशाचे प्रमुख आहात तुमच्यापर्यंत हे प्रकरण पोहोचले आहे. मी तुमच्या घरातील मुलगी विनेश फोगाट आहे आणि गेल्या एक वर्षांपासून ज्या हालमध्ये आहे ते सांगण्यासाठी मी हे पत्र लिहित आहे.
फोगाटने पुढे लिहिले की मला आठवत आहे की २०१६मध्ये जेव्हा साक्षी मलिक ऑलिम्पिक पदक जिंकून आली होती तेव्हा सरकारने त्यांना बेटी बचाओ, बेटी पढाओचा ब्राँड अॅम्बेसिडेर बनवले होते. याची घोषणा झाली तेव्हा संपूर्ण देशातील महिला खुश झाल्या होत्या. त्यांनी एकमेकांचे अभिनंदन केले होते. आज जेव्हा साक्षीला कुस्ती सोडावी लागली तेव्हा मला २०१६ पुन्हा पुन्हा आठवत आहे.
गुरूवारी डब्लूएफआयचे अध्यक्ष पद निवडणुकीत भाजप खासदार बृजभूषण सिंह यांच्या जवळचे संजय सिंहने विजय मिळवला होता. याच्या विरोधात शुक्रवारी बजरंग पुनियाने पंतप्रधान मोदींना पत्र लिहत पद्मश्री परत करण्याची घोषणा केली होती.
रिओ ऑलिम्पिकची कांस्यपदक विजेती साक्षी मलिकने गुरूवारी टेबलावर आपले शूज ठेवत निवृत्तीची घोषणा करत भावूकपणे म्हटले होते की आम्ही मनापासून लढाई लढली, मात्र बृजभूषण सिंह यांच्या जवळच्या व्यक्तीला WFIचे अध्यक्षपद मिळाले आहे मी कुस्ती सोडत आहे.
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज कोलकाता नाईट रायडर्सची टक्कर गुजरात टायटन्सशी होत आहे. हा…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…