Sunday, July 14, 2024
Homeताज्या घडामोडीUttarakhand News : वीटभट्टीची भिंत कोसळून ६ कामगारांचा मृत्यू; ७ जखमी

Uttarakhand News : वीटभट्टीची भिंत कोसळून ६ कामगारांचा मृत्यू; ७ जखमी

डेहराडून : उत्तराखंड (Uttarakhand) येथे गेल्या महिन्यात बोगदा कोसळल्याने ४१ मजूर अडकले होते. तब्बल १७ दिवसांनी त्यांची सुटका करण्यात यश आले. यानंतर उत्तराखंडमधून पुन्हा एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. विटभट्टीवरील कच्चे बांधकाम असलेली भिंत अंगावर कोसळल्याने ६ मजुरांना जीव गमवावा लागला, तर ७ मजूर जखमी झाले आहेत.

उत्तराखंडच्या रुडकी येथे आज सकाळी ही भीषण अपघाताची घटना घडली. मंगलौर तालुक्यातील लहबोली गावात सकाळी वीटभट्टीवर कामासाठी आलेल्या मजुरांच्या अंगावर विटभट्टीवरील कच्चे बांधकाम असलेली भिंत कोसळली. त्यामध्ये, भिंतीच्या विटांच्या ढिगाऱ्याखाली दबून ६ कामगारांचा मृत्यू झाला व ७ जण गंभीर जखमी झाले. जखमींना तात्काळ जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच लक्सर येथील आमदार मोहम्मद शहजाद, पोलीस अधीक्षक यांच्यासह अधिकारी घटनास्थळी दाखल झाले व मदतकार्य सुरू करण्यात आले.

लहबोली गावात विटभट्टी कारखानदारी आहे. येथे जवळपास १०० पेक्षा अधिक कामगार काम करतात. यावेळी, कच्च्या विटांची भट्टीत भरणी करण्याचं काम सुरू होतं. त्याचदरम्यान, कच्च्या विटांची भिंत कोसळून दुर्घटना घडली. या ढिगाऱ्याखाली ८ ते १० कामगार दबले. स्थानिकांच्या व आजूबाजूच्या परिसरातील कामगारांच्या मदतीने तसेच जेसीबीच्या मदतीने विटा बाजूला सारुन कामगारांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. या दुर्घटनेत मुकुल, साबिर, अंकित, बाबूराम आणि जग्गी या मजुरांचा जागेवरच मृत्यू झाला. तर आशु, समीरसह ५ जण जखमी झाले आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -