Friday, October 4, 2024
Homeताज्या घडामोडीCorona Updates : देशात कोरोना रुग्णसंख्या ४१०० पार; ११६ नवे रुग्ण, ३...

Corona Updates : देशात कोरोना रुग्णसंख्या ४१०० पार; ११६ नवे रुग्ण, ३ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत (Corona Updates) पुन्हा एकदा वाढ होत आहे. नाताळ आणि नववर्षामुळे पर्यटन स्थळांवर गर्दी वाढली आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत कोरोना रुग्णांच्या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशातील सक्रीय रुग्णांची संख्या ४१७० इतकी झाली आहे. भारतात आज ११६ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तिन्ही रुग्ण कर्नाटकमधील आहेत. मागील २४ तासांत २९३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

सर्वाधिक रुग्ण केरळमध्ये, सक्रीय रुग्णांची संख्या ३०९६

सर्वाधिक सक्रीय रुग्ण केरळमध्ये आहेत. केरळमध्ये मंगळवारी एकही नवीन रुग्ण आढळला नाही तर ३२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. येथील सक्रीय रुग्णांची संख्या ३०९६ इतकी झाली आहे.

महाराष्ट्रातील सक्रीय रुग्णांची संख्या १६८ इतकी झाली आहे. तामिळनाडूमध्ये १३९, कर्नाटकमध्ये ४३६ सक्रीय रुग्ण आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, मंगळवारी देशात कोरोनाच्या जेएन.१ या सब व्हेरियंटचे ११६ नवे रुग्ण आढळले आहेत.

जानेवारी २०२२ मध्ये कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेयरियंटने धुमाकूळ घातला होता. जगभरात कोरोनाची तिसरी लाट आली होती. कोरोना विषाणू म्यूटेशनमुळे नवे व्हेरियंट येत आहे. जेएन१ हा व्हेरिएंट पहिल्यांदा ऑगस्टमध्ये आढळून आला. हा ओमायक्रॉनचा उप-प्रकार BA.2.86 ने तयार झाला आहे. सध्या आलेल्या जेएन१ या कोरोना सब व्हेरियंटसाठी लसीकरणाची गरज नसल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे.

जेएन१चे सर्वाधिक रुग्ण गोव्यात

गोव्यात जेएन१चे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. आतापर्यंत गोव्यामध्ये जेएन१चे ३४ नवे रुग्ण सापडले आहेत. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात १० कर्नाटकात आठ, केरळमध्ये सहा, तामिळनाडूमध्ये चार आणि तेलंगणामध्ये दोन रुग्ण आढळून आले आहेत.

जागतिक आरोग्य संघटनेचाही इशारा

गेल्या एका महिन्यात जगभरात कोरोनाच्या नवीन रुग्णांमध्ये ५२ टक्क्यांची वाढ झाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) ही माहिती दिली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने आपल्या अहवालात म्हटले आहे की, २० नोव्हेंबर ते १७ डिसेंबर दरम्यान कोरोनाच्या एकूण ८,५०,००० हून अधिक नवीन प्रकरणांची नोंद झाली आहे. यामध्ये ३,००० हून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -