Friday, October 11, 2024
Homeताज्या घडामोडीShivrayancha Chhava : 'शिवरायांचा छावा' चित्रपटातील संभाजीचा चेहरा आला समोर; पाहा नवं...

Shivrayancha Chhava : ‘शिवरायांचा छावा’ चित्रपटातील संभाजीचा चेहरा आला समोर; पाहा नवं पोस्टर

कोण साकारणार संभाजी?

मुंबई : दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar) या मराठी दिग्दर्शकाने शिवराज अष्टकातून (Shivraj Ashtak) छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) इतिहास लोकांसमोर मांडण्याचं शिवधनुष्य हाती घेतलं आहे आणि हे काम तो अत्यंच जबाबदारीने आणि यशस्वीपणे पार पाडत आहे. त्याने शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर प्रेक्षकांच्या भेटीला आणलेले पाचही चित्रपट सुपरहिट ठरले. आता त्याचा ‘शिवरायांचा छावा’ (Shivrayancha Chhava) हा सहावा संभाजी महाराजांच्या (Sambhaji Maharaj) आयुष्यावरील चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, आणि प्रेक्षकांना याबद्दल कमालीची उत्सुकता लागून राहिली आहे.

दरम्यान, या चित्रपटात संभाजी महाराजांची भूमिका कोण साकारणार असा एक मोठा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. चित्रपटाचं पहिलं पोस्टर आऊट करण्यात आलं, त्यात संभाजी महाराजांची भूमिका साकारणारा कलाकार पाठमोरा उभा होता, त्यामुळे काहीच अंदाज येऊ शकला नाही. आज सिनेमाचं दुसरं पोस्टर आऊट करण्यात आलं, पण गंमतीची बाब अशी की यात कलाकाराचा चेहरा समोर असूनही तो ओळखता येत नाही.

चित्रपटाचं दुसरं पोस्टर मोठ्या शिताफीने डिझाईन करण्यात आलं आहे. संभाजी महाराज साकारणार्‍या कलाकाराविषयी प्रेक्षकांची उत्सुकता ताणून ठेवण्यात दिग्दर्शक यशस्वी झाला आहे. पोस्टरमध्ये छत्रपती संभाजी महाराज साकारणाऱ्या अभिनेत्याची झलक बघायला मिळतेय. मागे सिंह दिसत असून त्यासमोर रुद्रावतारात संभाजी महाराज बघायला मिळत आहेत.

पोस्टर पाहून हा कलाकार नवखा असावा, असा अंदाज येत आहे. यात डोळे आणि अर्धा चेहरा स्पष्ट दिसत आहे, मात्र चेहरा ओळखण्यासाठी चेहर्‍यावर तितकासा प्रकाश नाही. असं असलं तरी पोस्टर पाहताच क्षणी उत्सुकता लागून राहते. यातून एखादा नवखा अभिनेता शिवरायांचा छावा सिनेमाच्या माध्यमातून सिनेसृष्टीत पदार्पण करणार अशी दाट शक्यता निर्माण झाली आहे.

दरम्यान, सिनेमात चिन्मय मांडलेकर, मृणाल कुलकर्णी हे कलाकारही झळकणार आहेत. चित्रपटाच्या छायांकनाची जबाबदारी प्रियांका मयेकर यांनी सांभाळली आहे तर संकलन सागर शिंदे यांचे आहे. चित्रपटाच्या वितरणाची जबाबदारी ए. ए . फिल्म्स सांभाळत आहे. नववर्षात म्हणजेच १६ फेब्रुवारी २०२४ ला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -