Wednesday, April 30, 2025

देशताज्या घडामोडी

Rajasthan: ॲक्शन मोडमध्ये CM भजनलाल, अचानक पोहोचले SMS हॉस्पिटल, ३ कर्मचारी दिसले नाही तर केले निलंबित

Rajasthan: ॲक्शन मोडमध्ये CM भजनलाल, अचानक पोहोचले SMS हॉस्पिटल, ३ कर्मचारी दिसले नाही तर केले निलंबित

जयपूर: राजस्थानचे मुख्यमंत्री बनल्यानंतर भजनलाल शर्मा(bhajanlal sharma) सातत्याने अॅक्शन मोडमध्ये दिसत आहेत. यातच सोमवारी मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त जयपूरच्या सवाई मानसिंह हॉस्पिटलचे परीक्षण केले. जयपूरच्या शासकीय रुग्णालयातील अस्वच्छतेवरून सीएमने अधिकाऱ्यांना कडक कारवाईचे आदेश दिले. सोबतच सीएम म्हणाले आमच्या सरकारमध्ये काम आणि जबाबदारीबाबत कोणत्याही प्रकारचे चालढकल सहन केली जाणार नाही.

यावेळी सीएमच्या भेटीदरम्यान हॉस्पिटलमधील तीन कर्मचारी अनुपस्थित होते. या अनुपस्थित कर्मचाऱ्यांना तातडीने निलंबित करण्यात आले. रुग्णालयातील वरिष्ठ नर्सिंग अधिकारी मुकेश बाबू, आलम अली खान, नर्सिंग अधिकारी मुकेश कुमार यांना निलंबित करण्यात आले.

सीएमनी ओटीएसमध्ये हॉस्पिटलचे वरिष्ठ डॉक्टर्स आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीला संबोधित करताना म्हटले, सर्व डॉक्टर, अधिकारी आणि इतर कर्मचाऱ्यांनी इमानदारीने आपले काम करावे. सोबतच उशिरा येणारे आणि बेफिकीर राहणाऱ्या लोकांविरोधात कडक पावले उचलली जावीत.

स्वच्छता चांगली असावी

सीएमने डॉक्टरांना आदेश दिले की तातडीने रुग्णालय परिसराची स्वच्छता केली जावी. यासाठी बेपर्वाई करणाऱ्या लोकांविरोधात कडक कारवाई केली जावी. रुग्णांना चांगल्या आरोग्य सुविधा आणि योग्य ती देखभाल मिळावी. त्यांना तसेच त्यांच्या कुटुंबियांना स्वच्छ आणि स्वस्थ वातावरण मिळावे.

Comments
Add Comment