इस्लामाबाद: पाकिस्तानात(pakistan) पुढील वर्षी २०२४मध्ये ८ फेब्रुवारीला निवडणूक होत आहे. या निवडणुकीत पहिल्यांदा खैबर पख्तूनखा येथील बुनेर जिल्ह्यातील एका हिंदू महिलेने आपले नॉमिनेशन फाईल केले आहे. डॉनच्या रिपोर्टनुसार सवेरा प्रकाश नावाच्या हिंदू महिलेने बुनेर जिल्ह्यात पीके २५ या जागेसाठी आपले नॉमिनेशन फाईल केले आहे.
हिंदू गटाची सदस्य सवेरा प्रकाश यांनी आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या तिकीटावर निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे. सवेरा प्रकाश यांच्या वडिलांचे नाव ओम प्रकाश आहे हे रिटायर डॉक्टर आहेत. ते याआधी पाकिस्तान पीपल्स पार्टीचे सदस्य होते.
सवेरा प्रकाश मेडिकल विद्यार्थिनी
डॉनच्या रिपोर्टनुसार सोमवारी खैबर पख्तूनखाचे स्थानिक नेता सलीम खान कौमी वतन पक्षाशी जोडले गेले. त्यांनी सांगितले की सवेरा प्रकाश बुनेरच्या जागेवरून आगामी निवडणूक लढवण्यासाठी नॉमिनेशन फाईल जमा कऱणारी पहिली महिला आहे. सवेरा प्रकाशने एबटाबाद आंतरराष्ट्रीय मेडिकल कॉलेजमधून २०२२मध्ये ग्रॅज्युएशन केले आहे. ती पाकिस्तान पीपल्स पार्टी महिला विंगची महासचिव म्हणून कार्यरत आहे. सवेरा प्रकाशने महिला विंगची महासचिव म्हणून काम केले आहे. त्यांनी महिलांसाठी चांगले काम केले आहे. याशिवाय वातावरण साफ ठेवण्यासाठीही काम केले आहे.