Saturday, July 20, 2024
HomeदेशPM Modi : नरेंद्र मोदी ठरले जगातील बेस्ट युट्युबर पंतप्रधान

PM Modi : नरेंद्र मोदी ठरले जगातील बेस्ट युट्युबर पंतप्रधान

यूट्यूब चॅनेलवर तब्बल २० दशलक्ष सबस्क्राइबर्स मिळवणारे पहिले जागतिक नेते

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) हे त्यांच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर तब्बल २० दशलक्ष सबस्क्राइबर्स मिळवणारे पहिले जागतिक नेते ठरले आहेत. नरेंद्र मोदी यांच्या युट्युब चॅनेलवरच नव्हे तर सर्वच सोशल मीडियावर विविध प्रकारचे व्हिडीओ पाहायला मिळतात. यापूर्वीही मोदींनी सोशल मीडियावर आपली दमदार छाप पाडली होती. आता या नव्या विक्रमासह मोदी हे भारतातली अन्य राजकीय नेत्यांच्याच नव्हे तर जगभरातील सर्व राजकारण्यांच्या पुढे पोहोचले आहेत. केवळ सबस्क्राइबर्स नाहीत तर त्यांच्या व्हिडिओंना मिळणाऱ्या एकूण व्ह्यूजची संख्या सुद्धा सर्व नेत्यांहून अधिक आहे.

नरेंद्र मोदी यांच्या चॅनेलवर आजपर्यंत ४.५ अब्ज (४५० कोटी) व्ह्यूज मिळाले आहेत. त्यातील बहुसंख्य व्ह्यूज हे केवळ भारतातीलच नसून जगभरातील प्रेक्षकांचे आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या युट्युब चॅनेलवर अंदाजे २३,००० व्हिडिओ असून यूट्यूबच्या पलिकडेही, त्यांचा प्रभाव इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअॅप सारख्या अन्य प्लॅटफॉर्मवरही विस्तारला आहे. यापूर्वी २०२२ मध्ये, पंतप्रधान मोदी यांच्या युट्युब चॅनेलने एक कोटी सदस्यांचा टप्पा ओलांडला होता आणि आता २०२३ च्या सरतेशेवटी मोदींच्या चॅनेलवरील सबस्क्राइबर्समध्ये आणखी १ कोटींची भर पडली आहे.

पंतप्रधानांनी यूट्यूबवर विविध प्रकारचे व्हिडीओ शेअर केले आहेत. ज्यामध्ये शासन, धोरणे आणि त्यांची विविध भाषणे यांचा समावेश आहे. मोदी सरकारच्या योजनांविषयी सुद्धा यातून माहिती दिली जाते. तसेच काही योजनांचे यश सुद्धा या माध्यमातून शेअर केले जाते. यूट्यूब व्यतिरिक्त, पंतप्रधान मोदी X, इन्स्टाग्राम आणि व्हॉटस् ॲप सारख्या इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे लोकांशी सक्रियपणे जोडलेले आहेत. तसेच व्ह्यूजच्या बाबतीत, मोदींच्या चॅनलचे वर्चस्व कायम आहे. डिसेंबर २०२३ मध्येच प्रभावी २. २४ अब्ज व्ह्यूज मोदींच्या चॅनेलला मिळाले होते. हा आकडा जागतिक स्तरावर दुसऱ्या क्रमांकावरील व्ह्यूज असलेल्या झेलेन्सी यांच्यापेक्षा ४३ पट जास्त आहे.

दरम्यान, मोदींच्या पाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर ब्राझीलचे माजी राष्ट्रपती जैर बोल्सनोरा हे आहेत. त्यांच्या सबस्क्राइबर्सची संख्या ६. ४ दशलक्ष इतकी आहे. ही संख्या मोदींच्या तुलनेत केवळ एक अंश आहे. तर जागतिक नेत्यांमध्ये तिसरे सर्वाधिक सबस्क्राइब केलेले चॅनल हे युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांचे (१. १ दशलक्ष) आहे. तर या यादीत चौथ्या स्थानावर, युनायटेड स्टेट्सचे अध्यक्ष जो बायडन असून यांच्या युट्युब चॅनेलवर केवळ ७ लाख ९४ हजार सदस्य आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -