मुंबई: भारतीय संघ आजपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्यांच्याच देशात २ कसोटी सामन्यांची मालिका खेळत आहे. पहिली कसोटी सेंच्युरियनमध्ये भारतीय वेळेनुसार दुपारी दीड वाजता सुरू होईल. भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेच्या जमिनीवक आतापर्यंतच्या इतिहासात एकही द्विपक्षीय मालिका जिंकलेली नाही.
भारतीय संघ १९९२पासून दक्षिण आफ्रिकेच्या जमिनीवर कसोटी मालिका खेळत आहे. मात्र त्यांना आतापर्यंत एकाही मालिकेत विजय मिळवता आलेला नाही. भारतीय संघाने आतापर्यंत आफ्रिकेत ८ द्विपक्षीय मालिका खेळल्या. यातील ७मध्ये त्यांना पराभव सहन करावा लागला तर १ अनिर्णीत राहिली होती.
दक्षिण आफ्रिकेत ९वी कसोटी मालिका खेळणार भारत
दोन्ही संघादरम्यान एकूण १५ द्विपक्षीय मालिका खेळवण्यात आल्या आहेत. यातील ४ मालिका भारताने जिंकल्या तर ८ मालिका गमावल्या. ३ मालिका अनिर्णीत राहिल्या. मात्र यावेळेस भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेतील विजयाचा दुष्काळ नक्कीच संपवणार आहे. गेल्या ३१ वर्षात जे जमले नाही ते यावेळेस करून दाखवण्याचा आफ्रिकेचा प्रयत्न असेल.
एकदिवसीय विश्वचषक २०२३च्या फायनलमध्ये ३६व्या दिवशी मिळालेल्या पराभवाला विसरून भारतीय संघाला मोठे यश मिळवण्यासाठी संपूर्ण ताकद पणाला लावावी लागेल.
दक्षिण आफ्रिकेतील दोन्ही संघादरम्यानचा कसोटी रेकॉर्ड
एकूण कसोटी मालिका – ८
आफ्रिका संघाने जिंकलेल्या मालिका – ७
भारतीय संघाने जिंकलेल्या मालिका – ०
अनिर्णीत – १
रोहितकडे इतिहास रचण्याची संधी
एकदिवसीय विश्वचषकात रोहित शर्माकडे कपिल देव आणि महेंद्रसिंग धोनी यांची बरोबरी साधण्याची संधी होती. मात्र फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून झालेल्या पराभवामुळे तो विश्वकप विजेता कर्णधार बनू शकला नाही. आता त्याच्याकडे दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकणारा पहिला भारतीय कर्णधार बनण्याची संधी आहे.