मुंबई: आजकाल जेवण पॅक करण्यासाठी अॅल्युमिनियम फॉईलचा(aluminium foil) वापर खूप वाढला आहे. मात्र ही अॅल्युमिनियम फॉईल आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. दरम्यान, यामुळे काय नुकसान होते याची माहिती फार कमी लोकांना असते. तुम्हीही जर जेवण अॅल्युमिनियम फॉईलमध्ये जेवण पॅक करत असाल तर जाणून घ्या यामुळे काय नुकसान होते ते.
तज्ञांच्या मते अॅल्युमिनियम फॉईलचा वापर आरोग्यासाठी हानिकारक आहे. जेव्हा आपण अॅल्युमिनियम फॉईलचा वापर जेवण गरम ठेवण्यासाठी करतो तेव्हा गरम जेवण अॅल्युमिनियम फॉईलच्या संपर्कात येते आणि ती तत्वे जेवणात उतरतात. दीर्घकाळ असे जेवण जेवल्याने विस्मरणाचा धोका वाढतो.
काय म्हणतात तज्ञ?
तज्ञांच्या मते अॅल्युमिनियम फॉईलमध्ये जेवण पॅक करणे योग्य आहे मात्र दीर्घकाळ याचा वापर करत राहिल्यास ते आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. खासकरून जेव्हा अॅल्युमिनियम फॉईलमध्ये अॅसिडिक आणि खारट पदार्थ दीर्घकाळ ठेवले जातात. यातील केमिकल रिअॅक्शनमुळे जेवणाची चव बदलू शकते. तसेच लीव्हर आणि किडनीशी संबंधित समस्या होऊ शकतात.
गंभीर आजारांचा धोका
तज्ञांच्या मते, अॅल्युमिनियम फॉईलमध्ये ठेवलेले जेवण दीर्घकाळ सेवन करत राहिल्यास पुरुषांमध्ये इंफर्टिलिटीची गंभीर समस्या वाढे. यामुळे हाडांच्या विकासावरही परिणाम होतो. तसेच किडनीचीही समस्या सतावू शकते. याशिवाय अॅल्युमिनियमच्या भांड्यात जेवण बनवल्याने तसेच ठेवल्याने आणि खाल्ल्याने शरीरात अनेक धोकादायकतत्वे जमा होतात. यामुळे रोगप्रतिकारक क्षमता कमी होते. अस्थमा, लिव्हरच्या समस्या उद्भवतात.