Tuesday, May 13, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडी

पिंपरणे पुलावरून बस कोसळली; सुदैवाने जीवीत हानी नाही

पिंपरणे पुलावरून बस कोसळली; सुदैवाने जीवीत हानी नाही

संगमनेर : संगमनेर ते कोळेवाडी गाडी नंबर एम एच ०७ सी ९१४६ ही एसटी बस कोळेवाडी या ठिकाणी मुक्कामी गेली होती. ती पुन्हा सकाळी संगमनेरकडे खांबा वरवंडी शिबलापुर हंगेवाडी मार्गे संगमनेरला जात असताना पिंपरणे पुलावरून खाली कोसळली. सुदैवाने कोणताही अनर्थ घडला नाही, प्रवासी किरकोळ जखमी झाले. नशीब बलवत्तर जवळच असलेल्या ट्रान्सफरवर बस कोसळली नाही, नाहीतर मोठा अनर्थ घडला असता.


सदरची घटना सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास घडली. बस चालक मनोहर गागरे, कंडक्टर एस एस बर्डे हे दोघे किरकोळ जखमी झाले. एसटी बस कोसळली त्यावेळेस बस मध्ये ७० च्या आसपास प्रवासी प्रवास करत होते. ४७ प्रवासी तिकीटधारी पासवाले १५ ते २० असतील एस एस बर्डे यांनी सांगितले आहे.


यावेळी संगमनेर तालुका ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे यांनी घटनास्थळी तातडीने भेट दिली व जखमीची चौकशी केली. जखमींना पुढील उपचारासाठी संगमनेर येथे हलविण्यात आले. अपघातग्रस्तांना गावातील तरुण, पोलीस पाटील विनोद साळवे, सरपंच नारायण मरभळ, मंज्याबापू साळवे, संदीप साळवे, ऋषी साळवे, संजय बागुल, राजहंस संघाचे संचालक रवींद्र रोहम, गोकुळ काळे, निलेश बागुल, वाहक अरुण वाकचौरे व ग्रामस्थांनी मदत केली.

Comments
Add Comment