Monday, March 17, 2025
Homeताज्या घडामोडीPune news : पुण्यात येरवडा भागात १५ ते २० गाड्यांची तोडफोड

Pune news : पुण्यात येरवडा भागात १५ ते २० गाड्यांची तोडफोड

पुणे : गेल्या काही दिवसांत पुण्यात (Pune) सातत्याने गुन्हेगारीच्या घटना (Crime incidents) घडत आहेत. आरोपींसाठी अत्यंत कडक असलेल्या पुण्याच्या येरवडा कारागृहातून (Yerwada Jail) तर चक्क आरोपी पळून गेल्याच्या घटना देखील घडल्या. त्यातच आता पुणे शहर आणि परिसरात मागील काही दिवसांपासून हातात कोयते किंवा शस्त्र घेऊन वाहनांची तोडफोड (Car vandalized) करण्यात येत आहे. असाच प्रकार काल रात्री पुण्यातल्या येरवडा परिसरात घडला. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.

पुण्यातल्या येरवडा भागात काल रात्री काही अज्ञातांकडून रस्त्याच्या कडेला असलेल्या गाड्यांची तोडफोड करण्यात आली. यात १५ ते २० गाड्यांचे नुकसान झाले आहे. यामध्ये कार, दुचाकी आणि रिक्षाचा समावेश आहे. अशी तोडफोड करणार्‍या लोकांना नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस अयशस्वी ठरत आहेत, अशी तक्रार नागरिकांकडून केली जात आहे.

येरवडा परिसरातील काही नागरिकांनी यासंदर्भात पोलिसांकडे तक्रार केली. मात्र पोलिसांनी अद्याप तोडफोड करणार्‍या कोणालाही ताब्यात घेतलेलं नाही. पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत. पोलिसांनी या प्रकरणी गंभीर पावले उचलावीत, अशी मागणी पुणेकरांनी केली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -