नवी दिल्ली : देशात पुन्हा एकदा कोरोना विषाणू हातपाय पसरू लागला आहे. कोरोनामुळे केरळमध्ये एकाचा मृत्यू झाल्याने देशभरातील लोकांची चिंता वाढली आहे. गेल्या २४ तासांत कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटच्या रुग्णात तिप्पट वाढ झाली आहे.
रिपोर्टनुसार, देशातील सहा राज्यात जेएन.१ व्हेरिएंटच्या रुग्णाची संख्या २२ होती, आता ती संख्या ६३ वर पोहोचली आहे. एका अभ्यासातून माहिती समोर आली आहे की, कोरोनाच्या जेएन.१ व्हेरिएंटचा थेट परिणाम व्यक्तीच्या घशावर होतो. या आजारामुळे आवाजही जाण्याची शक्यता आहे. सध्या देशात कोरोनाच्या एक्सबीबी व्हेरिएंटचे ९० टक्के रुग्ण आढळून येत आहे. देशात सध्या जेएन.१ व्हेरिएंटचे रुग्ण कमी आहेत.
देशात सध्या कोरोनाच्या जेएन.१ व्हेरिएंटच्या रुग्णांची संख्या ६३ आहेत. गोव्यात कोरोनाचे जेएन.१ व्हेरिएंटचे रुग्ण ३४, महाराष्ट्रात ९, कर्नाटकात ८, केरळमध्ये ६ तामिळनाडूत ४, तेलंगाणात २ आढळले आहेत. देशात गेल्या २४ तासात कोरोना-१९ चे ६२८ नवीन रुग्ण आढळले आहेत.