पोलीस आयुक्तांच्या भूमिकेने नाशिकच्या पारंपारिक सामाजिक सलोख्याला प्रोत्साहन
नाशिक : नाशिक धर्मप्रांताच्या नाशिक रोड मधील संत अन्ना महामंदिरात प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्मोत्सव मोठ्या दिमाखात धार्मिक विधी, तसेच महागुरूंच्या विशेष उपदेशाने साजरा करण्यात आला यावेळी नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी प्रार्थना स्थळाला भेट देत सर्व ख्रिस्ती बांधवांना नाताळ सणाच्या शुभेच्छा देत सामाजिक सलोखा राखण्याबाबत मौलिक मार्गदर्शन केले याचप्रमाणे मनुष्याने एक दुसऱ्यावर प्रीती करावी हा प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेला संदेश सर्वच मानव जातीने पाळल्यास मनुष्यापासून दुःख कोसो दूर राहील असा सांगत एकोपा आणि सुसंवाद वाढल्यास जीवनात फक्त आणि फक्त आनंदच राहील असेही त्यांनी सांगितले. यावेळी नाशिक धर्मप्रांताचे महागुरु लूर्ड्स डॅनियल व संत अन्ना महामंदिराचे धर्मगुरू नल्यासको गोम्स यांनी पोलीस आयुक्तांचे स्वागत केले.
शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी ख्रिस्ती बांधवांना नाताळच्या शुभेच्छा देत आपण मला ज्या आस्थेने आणि सन्मानपूर्वक स्वागत करत पवित्र मंदिरात मानाच्या ठिकाणी बसवलत याबद्दल मी ख्रिस्त मंडळाचे तसेच येथील महागुरु व धर्म प्रांतातील सर्व ख्रिस्ती बांधवांचे मनापासून आभार व्यक्त करतो व सर्वांना नाशिक शहर आयुक्तालयाकडून नाताळाच्या हार्दिक शुभेच्छा देत आपणा सर्वांच्या चांगल्या आरोग्याची देखील परमेश्वराकडे प्रार्थना करतो सामाजिक सलोखा हा कायमच जपला पाहिजे व आपल्या कुठल्याही प्रकारच्या अडचणी व समस्या असल्यास आपण त्या माझ्याकडे कधीही मांडू शकतात, माझ्यापर्यंत पोहोचण्यास आपल्याला कधीही कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही तसेच शहरातील कायदा सुव्यवस्था व सामाजिक सलोखा जपण्यात आपण सगळे एकजुटीने सहभागी होऊन चांगला आदर्श निश्चितच सर्व जनसामान्यांमध्ये निर्माण करू, एकात्मता प्रेम बंधुभाव ही मनुष्याची खरी नीतिमूल्य असावेत आणि त्याचं निरंतर आपण जपवणूक करणे गरजेचे आहे.
यावेळी नाशिक धर्मप्रांथाचे महागुरु लुड्स डॅनियल, फादर नल्यास्को गोम्स, फादर पीटर डिसूजा, फादर संतान रॉड्रिग्ज, फादर जोसेफ, सिस्टर आसिस फर्नांडिस, सिस्टर मिलबुर्गा, सिस्टर ललिता, तसेच बेंजामिन खरात, वॉल्टर कांबळे, मार्शल नडाफ, रुचीर खरात, नोएल दिवे, ऑस्टिन दास, राकेश साळवे, कुणाल पगारे, अमोल कांबळे, किशोर कदम, जॉन भालेराव, शशांक भालेराव, शोभा खरात, मंगल खरात, मंगल भालेराव, शैला खरात, अनिता कदम, उज्वला पाळंदे, गीतांजली दिवे, सोफिया गोंसालविस, एनी थॉमस, ग्रेसी वाघमारे, संगीता थोरात, सुप्रिया पलगडमल, आदींसह ख्रिस्ती बांधव हजर होते.