
मुंबई: मुंबईत १ नोव्हेंबरला २० वर्षी मुलाने आत्महत्या केली होती. घरातल्यांनाही याची खबर नव्हती की मुलाने असे पाऊल का उचलले. मात्र जेव्हा मुलाच्या मित्रांनी त्याच्या वडिलांनी खरी हकीकत सांगितली तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. यानंतर त्यांनी पोलिसांमध्ये त्या मुलीविरोधात आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
मुंबईच्या पवई पोलीस ठाण्यात १ नोव्हेंबरला प्रथम होवाळ यांनी फाशी घेत आत्महत्या केली होती. घरातल्यांनाही माहिती नव्हते की त्याने असे पाऊल का उचलले. मात्र तरूणाच्या मित्रांनी त्याच्या वडिलांनी सांगितले की प्रथमची प्रेयसी त्याला मानसिकरित्या त्रास देत होती. मित्रांनी पुढे सांगितले की प्रथमची प्रेयसी त्याच्याकडे पैशाची मागणी करत होती. यामुळे प्रथम खूप त्रस्त होता.
एक लाख दे शॉपिंगसाठी, जास्त नको.
याबाबतचे चॅटिंगही समोर आहे. यात मुलीने त्या आत्महत्या केलेल्या मुलाकडे शॉपिंगसाठी एक लाखाची मागणी केली आहे. या माहितीनुसार मुलाच्या वडिलांनी मुलीविरोधात एफआयआर दाखल केला आहे. पोलिसांनी भारतीय दंड विधानाच्या कलम ३०६ अंतर्गत एफआयआर दाखल केला आहे. दरम्यान, त्या मुलीला अद्याप अटक झालेली नाही. पोलीस या प्रकरणाता तपास करत आहे.