मुंबई: रोहित शर्मा भारतीय कर्णधाराच्या रूपात दक्षिण आप्रिकेत खेळवल्या जाणाऱ्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी उपलब्ध आहे. २६ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेआधी भारतीय कर्णधाराने पत्रकार परिषद घेतली. यात त्याने पुढील वर्षी खेळवल्या जाणाऱ्या टी-२० विश्वचषक २०२४मध्ये खेळण्याचे संकेत दिले आहेत. याआधी अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला होता की रोहित शर्मा टी-२० विश्वचषकात भारतीय संघाचा भाग असणार नाही.
पत्रकार परिषदेत रोहित शर्माने सांगितले की माझ्यासमोर आहे मी ते खेळण्यासाठी पाहत आहे. रोहित शर्माच्या या बोलण्यावरून कुठे ना कुठे स्पष्ट होते की तो २०२४मध्ये खेळवल्या जाणाऱ्या टी-२० विश्वचषकामध्ये खेळू शकतो. दरम्यान, याबाबत कोणतेही अधिकृत माहिती मिळालेली नाही. आता हे पाहणं विशेष असणार आहे की रोहित शर्मा २०२४चा टी-२० विश्वचषकत खेळणार की नाही.
भारतीय कर्णधाराशिवाय दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेत केएल राहुलबाबत म्हटले की त्याला केएल राहुलवर विश्वास आहे. तो नंबर चार आणि पाचवर चांगली बॅटिंग करतो. कसोटीत तो विकेटकीपिंग करू शकतो. मला माहीत आहे की तो किती वेळ असे करू शकतो.
रोहित शर्माने संघातील मुख्य वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीबाबत म्हटले की गेल्या ५ ते ७ वर्षात भारतीय वेगवान गोलंदाजांनी परदेशी भूमीवर चांगली कामगिरी केली आहे. आम्ही शमीला मिस करू. तरूण खेळाडू त्याची जागा घेण्याचा प्रयत्न करतील. मात्र हे सोपे असणार नाही.
तिसऱ्या गोलंदाजाबाबत भारतीय कर्णधाराने म्हटले की प्रसिद्ध कृष्णा आणि मुकेश कुमार यांनी चांगली कामगिरी केली. बुमराह आणि सिराज आमच्याकडे आहेत. आता हे पाहावे लागेल की आम्हाला स्विंग अथवा सीम कसे गोलंदाज हवेत.