Nitesh Rane : दुसऱ्याचं वाकून पाहणारा संजय राऊत!

'ते' एक कोटी उद्धव ठाकरेंचे नव्हे, तर...


आमदार नितेश राणे यांचा हल्लाबोल


मुंबई : ट्रस्ट स्थापन होताच अयोध्येत (Ayodhya) जाऊन उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) सर्वात पहिली एक कोटी रुपयांची देणगी दिली होती. त्यामुळे रामलल्ला हा कोणाच्या मालकीचा प्रश्न नाही, असा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला होता. त्यावर भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी जोरदार पलटवार केला आहे. ते एक कोटी नक्की कोणाचे होते, याचं स्पष्टीकरण द्या, असं आव्हान नितेश राणे यांनी दिलं आहे.


नितेश राणे म्हणाले, राम मंदिरासाठी सर्वात पहिली देणगी उद्धव ठाकरेंनी दिली असं संजय राऊत म्हणतात. पण आम्ही तर ऐकलं की ती देणगी एकनाथ शिंदेजींकडून (Eknath Shinde) घेऊन देण्यात आली आहे. आता हे खरं आहे की खोटं? एक कोटी हे एकनाथ शिंदेंचे आहेत की उद्धव ठाकरेंच्या खिशातले आहेत याचं पहिलं स्पष्टीकरण द्यावं आणि मगच देणगीबद्दल बोलावं, असा पलटवार नितेश राणे यांनी केला.


संजय राऊतांना उद्देशून नितेश राणे म्हणाले, संसदेमध्ये कलाकार असतात, असं म्हणत आमच्या उपराष्ट्रपतींचा अपमान करणाऱ्यांचं हे अप्रत्यक्षपणे समर्थन करत आहेत. तुम्ही जर कोणाची मिमिक्री करणं, कोणाचा आवाज काढणं याचं समर्थन करत असाल तर मालकाच्या मुलाला चालत असताना बघून म्याऊ म्याऊ चा आवाज काढला गेला, तेव्हा मालकाला एवढं का झोंबलं? मग त्या म्याऊ म्याऊ चं पण समर्थन करायला पाहिजे होतं. स्वतःच ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून ही संजय राजाराम राऊत याची घाणेरडी सवय झालेली आहे, अशी टीका नितेश राणे यांनी केली.



... तर दहा जनपथवर बसलेली मम्मी कसा कान कुरवाळेल


संजय राऊत आणि त्याचा मालक म्हणतात रामलल्ला काय भाजपची प्रॉपर्टी आहे का? अयोध्येच्या सातबारावर काय भाजपचे नाव आहे का? पण रामलल्लावर कडवट हिंदूंचा अधिकार आहे. अयोध्येत जिथे राममंदिर उभं राहतंय, त्याच्या सातबाऱ्यावर समस्त हिंदूंचं नाव आहे. तुमच्यासारख्या धर्मांतर झालेल्या, लव जिहाद झालेल्या, दाढी कुरवाळत बसलेल्या जिहाद्यांचं नाव नाही. तुझ्यासारखे चायनिज मॉडेल हिंदू ज्यांना रामाची आठवण फक्त निवडणुकीच्या निमित्ताने येते. २०१९ ला मालकाची घोषणा आठवा 'पहिले मंदिर फिर सरकार', आणि आता मंदिराचं नाव घेतलं की त्याची दहा जनपथवर बसलेली मम्मी कसा कान कुरवाळेल हे कळेल, असा टोला नितेश राणे यांनी लगावला.

Comments
Add Comment

मुंबईत पावसाचा जोर पुन्हा वाढला, रस्ते, रेल्वे वाहतूक मंदावली

मेगाब्लॉकमुळे रेल्वे सेवा कोलमडली मुंबई: गेल्या काही दिवसांपासून उसंत घेतलेल्या पावसाने मुंबईत पुन्हा एकदा

मुंबईकरांना पाण्याचे नो टेन्शन!

धरणांमध्ये ९९.१३ टक्के पाणीसाठा मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सर्व धरण आणि तलावांमधील पाणीसाठा आता वाढत

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा पहिला टप्पा २०२७ मध्ये

शिळफाटा आणि घणसोली दरम्यान ४.८८ किलोमीटर लांबीच्या बोगदा मुंबई : मुंबई आणि अहमदाबाद दरम्यान धावणाऱ्या बुलेट

एसटी बस आगारांचा १३ हजार एकर भूखंड ९८ वर्षांच्या भाडेपट्ट्याने देणार!

परिवहन महामंडळाचे कुर्ला, बोरिवली, राज्यातील इतर शहरांमध्ये भूखंड मुंबई : राज्य परिवहन मंडळाच्या राज्यातील बस

लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी आणखी एक चांगली बातमी...

दीड हजारांच्या मानधनातून हप्ते वळते होणार मुंबई : मुंबईत लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना व्यवसायासाठी

मुंबईत अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, पालघर, रायगडला रेड अलर्ट

कामाशिवाय घराबाहेर न पडण्याच्या महापालिकेच्या सूचना मुंबई (प्रतिनिधी) : परतीच्या पावसाने महाराष्ट्रात धुमाकूळ