Saturday, March 22, 2025
Homeमहत्वाची बातमीNitesh Rane : दुसऱ्याचं वाकून पाहणारा संजय राऊत!

Nitesh Rane : दुसऱ्याचं वाकून पाहणारा संजय राऊत!

‘ते’ एक कोटी उद्धव ठाकरेंचे नव्हे, तर…

आमदार नितेश राणे यांचा हल्लाबोल

मुंबई : ट्रस्ट स्थापन होताच अयोध्येत (Ayodhya) जाऊन उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) सर्वात पहिली एक कोटी रुपयांची देणगी दिली होती. त्यामुळे रामलल्ला हा कोणाच्या मालकीचा प्रश्न नाही, असा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला होता. त्यावर भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी जोरदार पलटवार केला आहे. ते एक कोटी नक्की कोणाचे होते, याचं स्पष्टीकरण द्या, असं आव्हान नितेश राणे यांनी दिलं आहे.

नितेश राणे म्हणाले, राम मंदिरासाठी सर्वात पहिली देणगी उद्धव ठाकरेंनी दिली असं संजय राऊत म्हणतात. पण आम्ही तर ऐकलं की ती देणगी एकनाथ शिंदेजींकडून (Eknath Shinde) घेऊन देण्यात आली आहे. आता हे खरं आहे की खोटं? एक कोटी हे एकनाथ शिंदेंचे आहेत की उद्धव ठाकरेंच्या खिशातले आहेत याचं पहिलं स्पष्टीकरण द्यावं आणि मगच देणगीबद्दल बोलावं, असा पलटवार नितेश राणे यांनी केला.

संजय राऊतांना उद्देशून नितेश राणे म्हणाले, संसदेमध्ये कलाकार असतात, असं म्हणत आमच्या उपराष्ट्रपतींचा अपमान करणाऱ्यांचं हे अप्रत्यक्षपणे समर्थन करत आहेत. तुम्ही जर कोणाची मिमिक्री करणं, कोणाचा आवाज काढणं याचं समर्थन करत असाल तर मालकाच्या मुलाला चालत असताना बघून म्याऊ म्याऊ चा आवाज काढला गेला, तेव्हा मालकाला एवढं का झोंबलं? मग त्या म्याऊ म्याऊ चं पण समर्थन करायला पाहिजे होतं. स्वतःच ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून ही संजय राजाराम राऊत याची घाणेरडी सवय झालेली आहे, अशी टीका नितेश राणे यांनी केली.

… तर दहा जनपथवर बसलेली मम्मी कसा कान कुरवाळेल

संजय राऊत आणि त्याचा मालक म्हणतात रामलल्ला काय भाजपची प्रॉपर्टी आहे का? अयोध्येच्या सातबारावर काय भाजपचे नाव आहे का? पण रामलल्लावर कडवट हिंदूंचा अधिकार आहे. अयोध्येत जिथे राममंदिर उभं राहतंय, त्याच्या सातबाऱ्यावर समस्त हिंदूंचं नाव आहे. तुमच्यासारख्या धर्मांतर झालेल्या, लव जिहाद झालेल्या, दाढी कुरवाळत बसलेल्या जिहाद्यांचं नाव नाही. तुझ्यासारखे चायनिज मॉडेल हिंदू ज्यांना रामाची आठवण फक्त निवडणुकीच्या निमित्ताने येते. २०१९ ला मालकाची घोषणा आठवा ‘पहिले मंदिर फिर सरकार’, आणि आता मंदिराचं नाव घेतलं की त्याची दहा जनपथवर बसलेली मम्मी कसा कान कुरवाळेल हे कळेल, असा टोला नितेश राणे यांनी लगावला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -