मुंबई: अभ्यास करता अनेकदा पुस्तके हातात घेतल्यावर तुमच्या मुलालाही झोप(sleep) येते का? मुलांमध्येच नाही तर मोठ्यांमध्येही ही समस्या पाहायला मिळते. अनेकदा पुस्तक वाचायचे असते मात्र ते हातात घेतल्यावर झोप येते. तुम्हालाही असेच होत असेल तर जरूर ट्राय करा खाली दिलेल्या टिप्स…
पुस्तके हातात घेताच का येते झोप
जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा डोळ्यांशी संबंधित स्नायूंवर ताण येतो. आपला मेंदू वाचलेल्या गोष्टी आठवून त्या एकत्रित साठवण्याचा प्रयत्न करत असतो. जेव्हा डोळ्यांचे स्नायू थकतात अथवा मंद गतीने काम करतात तेव्हा झोप येऊ लागते. अनेकदा अभ्यास करताना आपली बसण्याची स्थिती चुकीची असल्यास झोप येऊ शकते. येथेही तसेच होते आपण बस अथवा ट्रेनमध्येही बसल्या बसल्या झोपतो. त्यामुळे अभ्यासादरम्यान बॉडीचे पोस्चर अशा पद्धतीने ठेवा की ज्यामुळे खूप आरामदायक वाटणार नाही. तसेच त्यामुळे सुस्तीही येणार नाही.
अंधारात अभ्यास करू नका
जेव्हा तुम्हीही अभ्यासाला बसाल तेव्हा अशी जागा निवडा येथे पुरेसा उजेड असेल. यामुळे डोळ्यांवर कमी ताण येईल आणि सुस्ती जाणवणार नाही.
खुल्या जागेत अभ्यास करा
खुल्या जागा जसे छत, बाल्करनीमध्ये हवा आणि उजेड चांगला असतो यामुळे अशा ठिकाणी अभ्यास केला पाहिजे. यामुळे कमी सुस्ती येईल. तसेच झोपही येणार नाही.
अंथरूणावर झोपून अभ्यास करू नका
काही जणांना अंथरूणावर बसून अभ्यास करण्याची सवय असते. असे केल्याने आळस आणि सुस्ती जाणवते. यामुळे अभ्यासात मन लागत नाही. त्यामुळे अभ्यास करताना टेबल-खुर्चीवर बसून करा.
अभ्यासाआधी हलके जेवण घ्या
अधिक आणि झोप येणे स्वाभाविक आहे. अशातच जेवण जेवल्यानंतर लगेचच अभ्यासाला बसू नका. हलके आणि पचेल असे जेवण घ्या. खाल्ल्याने सुस्ती येणार नाही.