मुंबई: अनेक प्रकारचे व्हिटामिन्स आणि मिनरल्समुळे ड्रायफ्रुटचे सेवन फायदेशीर मानले जाते. काजूमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, फायबर आणि आर्यन मोठ्या प्रमाणात असते.
याच्या सेवनाने आपल्या शरीरातील रोग प्रतिकारक क्षमता अधिक वाढते. काजूमध्ये लिनोलिक आणि लिनोलिक अॅसिडसारखे अनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड असतात. हे दोन्ही अॅसिड स्ट्रोकचा धोका कमी करतात.
याशिवाय यातील व्हिटामिन ई अँटी एजिंग म्हणून काम करतात. सोबतच यातील मॅग्नेशियम आणि कॅल्शियममुळे थंडीच्या दिवसांत हाडांचे दुखणे कमी होण्यास मदत होते.
यातील फायबर आणि आर्यन रक्तातील ग्लुकोजला नियंत्रित ठेवण्याचे काम करतात. यामुळे डायबिटीजचा धोका कमी होतो.