
ख्रिसमसनिमित्त पहिल्यांदाच आली पॅपराझींसमोर
मुंबई : बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध जोडी आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूरने (Ranbir Kapoor) १४ एप्रिल २०२२ रोजी विवाह केला आणि एका वर्षातच ६ नोव्हेंबरला या जोडीने गोंडस मुलीला जन्म दिला. तेव्हापासून चाहते या मुलीचा चेहरा पाहण्यासाठी उत्सुक होते. या मुलीचं नाव 'राहा' (Raha Kapoor) ठेवण्यात आलं. नुकताच ६ नोव्हेंबरला तिचा पहिला वाढदिवसही साजरा करण्यात आला. मात्र, या दोघांनीही आपल्या मुलीचा चेहरा चाहत्यांना अद्याप दाखवला नव्हता.
आज ही जोडी त्यांच्या मुलीसह ख्रिसमसनिमित्त (Christmas) लंच प्रोग्रॅमसाठी गेली होती. त्यावेळी त्यांनी पहिल्यांदाच पॅपराझींसमोर (Paparazzi) येत आपल्या मुलीचा चेहरा रिव्हील केला. राहाच्या गोंडस हालचाली कॅमेर्यात कैद झाल्याने चाहते खूश झाले आहेत. पांढर्या रंगाचा फ्रॉक, दोन पोनीटेल, पिंक हेअरक्लिप्स, रेड शूज अशा लूकमध्ये राहा खूपच क्युट दिसत आहे.
View this post on Instagram
राहाचे फोटो आणि व्हिडीओ अवघ्या काही मिनिटांतच सोशल मीडियावर (Social Media) प्रचंड व्हायरल होत आहेत. ज्यावर नेटकरी लाइक्स आणि कमेंट्सचा (Likes and comments) वर्षाव करत आहेत.