
पुणे : पुण्यात गणेश पेठेतील (Ganesh peth) दारूवाला पुल मशीद ट्रस्टच्या आवारात असलेल्या गादीच्या कारखान्याला भीषण आग (Pune fire news) लागली. आज सकाळच्या सुमारास ही आग लागली. त्यात कारखान्यातील सर्व साहित्य जळून खाक झाले. कारखाना बंद असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, अग्निशमन दलाच्या दोन गाड्या आणि दोन पाण्याचे टँकर घटनास्थळी तातडीने रवाना करण्यात आल्याने मोठी हानी टळली. त्यांनी काही मिनिटांमध्ये आग आटोक्यात आणली. सध्या तेथे कुलिंगचे काम सुरु आहे. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज अग्निशमन दलाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
गणेश पेठेतील दारूवाला पुलाजवळील मस्जिद ट्रस्टच्या आवारामध्ये एक गादी कारखाना आहे. कारखाना बंद असताना सोमवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास या कारखान्याला आग लागली. कापूस, कापड असे साहित्य असल्याने आगीचे पटकन रौद्र रुप धारण केले.