मुंबई : “तू आता कोणत्या नात्याबद्दल बोलत आहेस? माझ्या नात्यात फक्त तूच नव्हतास. मी तुझ्यासोबतच्या माझ्या नात्याबद्दल कधीच पूर्णविराम दिले आहे. तुझ्यानंतरही माझ्या आयुष्यात इतर लोक आले. तू गेल्यानंतर आणखी एक व्यक्ती आली. माझे नाव वापरणे बंद कर आणि तू तुझा मार्ग शोध. माझ्या नावाचा कशाला वापर करतोस. लाज वाटली पाहिजे तुला, मी आता विवाहित आहे,” अशा भाषेत ऐश्वर्या शर्माने एक्स बॉयफ्रेंड राहुल पंड्याला झापले आहे.
बिग बॉस सुरू (Bigg Boss) झाल्यानंतर अनेक वेळा या शोमध्ये सहभागी असलेल्या स्पर्धकांशी संबंधित लोक त्यांच्या नावाचा वापर करून प्रसिद्धीझोतात येण्याचा प्रयत्न करतात. असाच प्रयत्न बिग बॉस १७ ची स्पर्धक ऐश्वर्या शर्माचा (Aishwarya Sharma) एक्स बॉयफ्रेंड राहुल पंड्याने (Rahul Pandya) केला होता. बिग बॉसच्या घरात ऐश्वर्या त्याच्याबद्दल बोलली होती आणि राहुलला तिचा हा दृष्टिकोन अजिबात आवडला नाही, असे राहुलने म्हटले होते. मात्र, बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर ऐश्वर्याने या संपूर्ण प्रकरणाबाबत अनेक खुलासे केले आहेत.
ऐश्वर्या शर्मा म्हणाली की, “हे काय नाटक आहे हे मला माहीत नाही, कारण २०१४ मध्ये माझे राहुलसोबत ब्रेकअप झाले होते. ब्रेकअपचे कारण त्याची वृत्ती होती. मी अभिनय थांबवावा, असे तो म्हणत होता. मी माझा अभिनय का सोडू? मी इथे अभिनेत्री बनण्यासाठी आली आहे, त्यामुळे मी अभिनय करणार हे उघड होते. अतिशय फालतू गोष्टी त्याच्याकडून बोलल्या गेल्या. त्याने इतक्या हृदयस्पर्शी गोष्टी सांगितल्या की मी इथे बोलू शकत नाही. म्हणूनच मी त्याच्यासोबत ब्रेकअप केले होते. त्याच क्षणी आमचे नाते संपुष्टात आले होते. त्यामुळे माझे नाव वापरणे बंद कर, आणि तू तुझा मार्ग शोध. मी आता विवाहित आहे, अशा भाषेत ऐश्वर्याने एक्स बॉयफ्रेंड राहुल पंड्याला झापले.