Wednesday, July 9, 2025

बांगरांचा ठाकरे गटाला दणका! ५ गावच्या सरपंचांसह २५० कार्यकर्त्यांचा ठाकरेंना जय महाराष्ट्र!

बांगरांचा ठाकरे गटाला दणका! ५ गावच्या सरपंचांसह २५० कार्यकर्त्यांचा ठाकरेंना जय महाराष्ट्र!

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी मतदार संघात ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. येथील शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी ठाकरे गटाला दणका दिला आहे. हिंगोलीमधील ५ गावचे सरपंच आणि २५० कार्यकर्त्यांनी ठाकरे गट सोडत शिंदे गटात प्रवेश केला आहे.


या सर्वांनी आमदार संतोष बांगर यांच्यावर विश्वास ठेवत शिवसेनेत पक्ष प्रवेश केला. हा प्रवेश सोहळा हिंगोलीतील शासकीय विश्रामगृहात पार पडला.


या पक्ष प्रवेशामुळे संतोष बांगर यांची ताकद नक्कीच वाढणार आहे. दरम्यान येणाऱ्या काळात आणखी काही कार्यकर्ते हे शिवसेनेत प्रवेश करतील, असा विश्वास बांगर यांनी व्यक्त केला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा