Tuesday, April 22, 2025
Homeताज्या घडामोडीLower parel fire : लोअर परळच्या फिनिक्स मॉलमधील आगीत २५ ते ३०...

Lower parel fire : लोअर परळच्या फिनिक्स मॉलमधील आगीत २५ ते ३० दुचाकी जळून खाक

मुंबई : लोअर परळमधील (Lower parel) फिनिक्स पॅलेडियम मॉल (Phoenix Palladium Mall) हे अत्यंत गजबजलेले ठिकाण आहे. या ठिकाणच्या पार्किंग लॉटमध्ये आग लागली. या आगीत ओपन पार्किंग एरियातील (Parking area) सुमारे २५ ते ३० मोटारसायकली जळून खाक झाल्या. आज दुपारी एक वाजेच्या दरम्यान ही आग लागली.

दरम्यान, अग्निशमन दलाच्या गाड्या येण्यापूर्वीच हायड्रंट यंत्रणेचा (Hydrant system) वापर करून आग विझवण्यात यश आले. ही आग लागल्याचे कळवण्यात आल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच दुपारी पावणेदोन पर्यंत आग पूर्णपणे विझवण्यात आली. त्यामुळे या घटनेत कोणतीही दुखापत झाली नाही.

सध्या फिनिक्स मॉलच्या नुतनीकरणाचे काम सुरु आहे. त्यामुळे सिमेंटचे ट्रक, जेसीबी, बांधकामाच्या गाड्या आणि मजुरांची या ठिकाणी सतत ये-जा असते. नाताळच्या निमित्त तर काल आणि आज या मॉलमध्ये लोकांची गर्दी पाहायला मिळाली होती. अनेकजण वीकेंड आणि ख्रिसमस साजरा करण्यासाठी आपल्या कुटुंबासमवेत मॉलमध्ये फिरायला आले होते. मात्र, दुपारच्या वेळी गर्दी कमी असल्याने आगीच्या घटनेत जीवितहानी टळली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -