मुंबई: भारत(india) आणि दक्षिण आफ्रिका(south africa) यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला २६ डिसेंबरपासून सुरूवात होत आहे. पहिला कसोटी सामना २६ डिसेंबरपासून सेंच्युरियनमध्ये खेळवला जाणार आहे. तर दुसरा सामना ३ जानेवारीपासून केपटाऊनमध्ये रंगणार आहे. भारतीय संघाने आफ्रिकेच्या धरतीवर आतापर्यंत कसोटी मालिका जिंकलेली नाही. त्यामुळे यावेळेस टीम इंडिया इतिहास रचण्याचा प्रयत्न करेल.
कसोटी मालिकेच्या सुरूवातीलाच भारतीय संघात काही बदल पाहायला मिळाले होते. मोहम्मद शमीच्या दुखापतीमुळे तो मालिकेतून बाहेर गेला होता. त्यानंतर ऋतुराज गायकवाड आणि इशान किशनलाही कसोटीतून बाहेर करावे लागले. ऋतुराजला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यादरम्यान फिल्डिंग करताना बोटाला दुखापत झाली होती. तर इशानने व्यक्तिगत कारणामुळे नाव मागे घेतले.
इशानच्या जागी केएस भरत आणि ऋतुराजच्या जागी अभिमन्यू इश्वरनला कसोटी संघात स्थान मिळाले आहे. पहिल्या कसोटी सामन्यासाठी टीम इंडियाच्या प्लेईंग ११वर सगळ्यांच्या नजरा असतील. या सामन्यासाठी योग्य कॉम्बिनेशन शोधणे हे टीम मॅनेजमेंटसाठी मोठे जिकरीचे काम असेल.
असे असेल भारतीय संघाचे कॉम्बिनेशन
भारतीय संघासाठी सेंच्युरियन कसोटीत युवा फलंदाज यशस्वी जयसवाल आणि रोहित शर्मा सलामीची भूमिका निभावू शकतात. तर शुभमन गिल तिसऱ्या स्थानावर येऊ शकतो. तर विराट कोहली चौथ्या आणि श्रेयस अय्यर पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरू शकतो. विकेटकीपर म्हणून केएल राहुलला पहिल्या कसोटीत संधी मिळू शकते. राहुलने आतापर्यंत कसोटीत विकेटकीपिंग केलेले नही मात्र फलंदाजी मजबूत करण्यासाठी त्याला विकेटकीपिंगची संधी मिळू शकते.
सेंच्युरियनची पिच वेगवान गोलंदाजीसाठी फायदेशीर ठरू शकते. क्युरेटनेही याचे संकेत दिलेत की वेगवान गोलंदाजांना येथे मदत मिळू शकते. अशातच शार्दूल ठाकूरला प्लेईंग ११मध्ये संधी मिळू शकते.
पहिल्या कसोटीसाठी भारताचे संभाव्य प्लेईंग ११ – रोहित शर्मा(कर्णधार), यशस्वी जयसवाल, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल(विकेटकीपर), रवींद्र जडेजा, आर. अश्विन, शार्दूल ठाकूर, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा.
कसोटी मालिका
पहिली कसोटी – २६ ते ३० डिसेंबर, पहिली कसोटी सेंच्युरियन दुपारी १.३० वाजता
दुसरी कसोटी – ३ ते ७ जानेवारी, दुसरी कसोटी, जोहान्सबर्ग, दुपारी १.३० वाजता.