प्रियंवदा कविता आणि काव्यकोडी

  72

आईने अंगणात लावली
चिमुकली जाईची वेल
तीची काळजी घेण्यात
ती घालवी बराच वेळ

चिमुकली जाई हळूहळू
मांडवावर चढली
पाहता पाहता भरभर
आधाराने वाढली

सुंदर जाईची फुलं
सायंकाळी फुलती
त्यांच्या मंद सुगंधाने
भुरळ सर्वांना घालती

फुलं शुभ्र नाजूक
पाकळ्या छान पसरट
त्यांची खालची बाजू
गुलाबी नि जांभळट

दिसायला गोजिरवाणी
नाजूक ही फुले
वेलीवर जणू डोलतात
गोड हसरी मुले

चमेली, प्रियंवदा ही
जाईचीच आहेत नावे
एवढेच ठाऊक त्यांना
सुगंध वाटीत जावे

काव्यकोडी : एकनाथ आव्हाड 


१) लांब काकडी
गोल भोपळा
आतून नुसताच
हवेचा गोळा

टाचणी टोचतात
फटकन फुटतो
नव्या रंगरूपात
कोण बरं भेटतो?

२) घरासाठी राबताना
दिसते हसतमुख
मुलांच्या सुखातच
असे तिचे सुख

मुलांसाठी आनंदाने
चंदन ती होई
संसाराची शिदोरी
सांगा कोणी देई?

३) चोच आहे, पंख आहे
रंग याचा काळा
बाळाच्या खाऊवर
असे याचा डोळा

गोष्टीमध्ये घर याचे
शेणाचे असते
पाहुणेरावळे येणार
सांगत कोण बसते?

उत्तर -
१) फुगा
२) आई
३) कावळा

Comments
Add Comment

गोष्ट एका उंदराची!

कथा : रमेश तांबे एक होता उंदीर. तो एका घरात राहायचा. घरभर फिरायचा. मि

सूर्य चालताना का दिसतो?

कथा : प्रा. देवबा पाटील आदित्यची त्याच्यासारख्याच एका हुशार पण गरीब मुलासोबत आता चांगली ओळख झाली होती. तो मुलगा

इलो मिरग

वैष्णवी भोगले खरंच कोकणातल्या मिरगाच्या पावसाची एक वेगळीच मज्जा असते. कोकण तसं वर्षभर सुंदर दिसलं तरी अधिक

सिडनीमध्ये मुंबईचा वडा-पाव

अजित राऊत आम्ही ऑस्ट्रेलियात अनेक प्रेक्षणीय ठिकाणी फिरलो. त्यातील प्रमुख म्हणजे सुप्रसिद्ध ऑपेरा हाऊस, तसेच

काव्यकोडी

एकनाथ आव्हाड गुरुजी गुरुजी आमचे रोजच फळ्यावर लिहायचे सुविचार म्हणायचे सुविचारासारखा

मेरी बात और हैं...

नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे साहिर म्हणजे तरल शायरीचा हॉलमार्क! हळव्या, उत्कट भावना तळहातावर घेऊन तुमच्या