Sunday, July 7, 2024
Homeताज्या घडामोडीNashik News : शहर पोलिसांच्या प्रतिमेला आव्हान!

Nashik News : शहर पोलिसांच्या प्रतिमेला आव्हान!

वडाळा म्हाडा परिसरात गोळीबार होऊनही पोलिस अनभिज्ञ; चोर पोलिसाच्या खेळात खाकी बदनाम

नाशिक : इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडाळा म्हाडा बिल्डिंग परिसरात १५ डिसेंबर रोजी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास चार ते पाच जणांच्या टोळक्यापैकी एकाने हवेत गोळीबार केल्याची घटना घडली होती. त्या गोळीबाराच्या घटनेबाबत कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल नव्हता. याच गोळीबाराच्या कारणावरून शुक्रवार दिनांक २२ डिसेंबर रोजी पुन्हा एकदा वडाळा तसेच पाथर्डी परिसरात संशयितांमध्ये बाचाबाची झाल्याने १५ तारखेला गोळीबार झाल्याची माहिती इंदिरानगर पोलीस ठाण्यात पोहोचली. या प्रकरणी इंदिरानगर पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले आहे. या गोळीबार प्रकरणात काही पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याची चर्चा आहे.

या घटनेच्या अधिक तपासासाठी शुक्रवारी सायंकाळपासून पोलीस उपायुक्त मोनिका राऊत व सहायक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांनीही इंदिरानगर पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला होता. मात्र या गोळीबाराबाबत कोणी कसा व कुठे गोळीबार केला या प्रकारची माहिती विचारली असता तपास सुरू असून लवकरच गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करण्यात येईल अशी माहिती पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी दिली आहे. विशेष म्हणजे एक हप्ता उलटला तरीही हवेत गोळीबाराबाबत इंदिरानगर पोलिसांना कोणत्याही प्रकारची कानखबरच नाही, त्यामुळे पोलीस नेमकी करतात तरी काय असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांमधून विचारला जात आहे.

आता पोलीस आयुक्त याबाबत काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे दरम्यान रात्री सव्वा दहा वाजेच्या सुमारास म्हाडा बिल्डिंग जवळ अज्ञात दहा-पंधरा जणांनी जात तेथे दमबाजी करत या प्रकरणात कुणी साक्ष दिली तर आमच्याशी गाठ आहे असा दम दिल्याचे देखील समजते. दरम्यान या प्रकरणी गुंडा पथकातील दोघा पोलिस कर्मचार्‍यांना पोलिस आयुक्तांसामोर चौकशी उभे केल्याचे समजते यावरुन कुंपनच शेत खाते याची प्रचिती यावरून निश्चितच येते.

गेल्याच आठवड्यात पवन नगर परिसरात मध्यरात्रीच्या दरम्यान भाजपाच्या एका माजी नगरसेवकावर किरकोळ कारणावरुन झालेल्या वादातुन जीवे मारण्याच्या उद्देशाने एका संशयीताने हवेत गोळीबार केला याप्रकरणी अद्यापही पोलिसांना तपास कामात कोणताही पुरावे मिळत नसल्याने मुख्य संशयित आरोपी पोलिसांना चकमा देत आहे परंतु त्या अगोदर इंदिरानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गोळीबाराची घटना घडून देखीलपोलिस मात्र अशा प्रकारची कोणतीही घटना घडली नसल्याचे दर्शवत माध्यमांपासुन सदरचा प्रकार लपविण्याचा प्रयत्न तर करत नाहीत ना असा प्रश्न उपस्थित होत आहे.

पोलीस खात्याची प्रतिमा मलिन!

गेल्या काही महिन्यांपासून विविध पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलिसांवर गुन्हेगारांना गुन्हेगारीसाठी पाठीशी घालण्याचा आरोप होत आहे. सन्माननीय अपवाद वगळता काही पोलिसांचा थेट, दोन नंबर धंद्यात भागीदारी असल्याचे सर्वश्रुत असतानाही आता , इंदिरानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गोळीबारात पोलिसांचा सहभाग तसेच गेल्या आठवड्यातच झालेल्या पवननगर येथील चौकात झालेल्या गोळीबार प्रकरणातील गुन्हे अन्वेषण आणि प्रकटीकरण अर्थात डी बी पोलिस पथकाच्या उपस्थितीत संशयीत फरार होतो तसेच गेल्या काही महिन्यांपुर्वी म्हसरुळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत चक्क एक पोलिस कर्मचा-याला सोनसाखळी चोरतांना पकडले तर गेल्या चार पाच दिवसांपुर्वी एका अल्पवयीनाकडुन तलवारीचा धाक दाखवून परिसरात दहशत माजविणारा एक संशयित आरोपी पोलिसांच्या हाताला धक्का देत चक्क पोलिस चौकीतुन फरार होणे या गोष्टी पोलिस यंत्रणेला जणु आव्हानच देतात. या एकूण कार्यपद्धतीवरुन पोलिस यंत्रणेची लक्तरे वेशीवर टांगली गेली असल्याचे बोलले जात असतांना या सर्व घटनांबाबत, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक कोणती भूमिका घेतात याकडे सर्व नाशिककरांचे लक्ष लागुन आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -