नानांचं पत्रं आलं...?

  68

आपले सर्वांचे लाडके, अस्सल मराठमोळे, संवेदनशील ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर हे सध्या त्यांच्या लाखो चाहत्यांना पत्र लिहित आहेत. हे पत्र आता कोणाकोणाला मिळणार? याची उत्सुकता चाहत्यांमध्ये निर्माण झाली आहे. त्यांचं असे असं आहे, नाना पाटेकर हे सध्या त्यांच्या “ओले आले” या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहेत. तसेच सध्या ते त्यांच्या या चित्रपटाचं प्रमोशन करत आहेत. त्यासाठी नाना पाटेकर हे त्यांच्या लाखो चाहत्यांना पत्र लिहित आहेत. त्यामुळे त्यांनी धाडलेलं हे पत्र आता कोणा भाग्यवंताला मिळणार? याची प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.


सिद्धार्थ चांदेकरच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नुकताच नाना पाटेकर यांचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला. ज्यात ते म्हणतात, “माझ्या थोड्या फार अनुभवातून मला एक उमगलं आहे. आपलं आयुष्य हे गणितासारखं असतं. माणसांची बेरीज, आनंदाचा गुणाकार, दु:खाचा भागाकार आणि वेळेची वजाबाकी. माझं आणि माझ्या मुलाचं समीकरण वेगळं आहे. त्याच्यासाठी मी लसावी म्हणजेच लघुत्तम साधारण विभाजक आणि माझ्यासाठी तो मसावी महत्तम साधारण विभाजक. माणसानी आनंदात राहायचं, आनंद वाटत राहायचं, वर्तमान जगायचं. पत्र लिहितोय तुम्हाला, कशासाठी माहितीये का? ५ तारखेला आमचा “ओले आले” सिनेमा येतोय. पब्लिसीटी चालू आहे. हिंदी सिनेमांसारखं आमचं मोठं बजेट नाही. जेवढं आहे, तेवढ्यात भागवायचं. आमची दिवाळीसुद्दा कशी असते माहितीये का? मोटरसायकल आणायची सायलेन्सर काढायचा त्याच्यात ३ लिटर पेट्रोल भरायचं किक मारायची आणि एक्सिलेटर देऊन ३ तास फटफट... झाली दिवाळी. बजेट नाही! त्यामुळे मला सांगा तुम्हाला शेवटचं पत्र कधी आलं? नाही आठवत नाही. भारतीय पोस्टकडून आलेलं पत्र म्हणजे आनंद आहे. ५ जानेवारीला “ओले आले” थिएटरमध्ये येत आहे. त्यासाठी कधीपासून एकटाच बसून पत्र लिहित आहे. नक्की या...”


नाना पाटेकर यांच्या व्हीडिओला कॅप्शन देण्यात आलं, “महाराष्ट्राचे लाडके नाना सध्या पाठवत आहेत त्यांच्या लाखो चाहत्यांना पत्रं! जर तुमच्याही घरी त्यांचं पोस्टकार्ड आलं असेल, तर त्याचा फोटो शेअर करा आणि @oleaalethefilm ला tag करा”. आता नानांचे हे पत्र कोणाकोणाला मिळणार? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.



‘सापळा’ थ्रिलरपट येतोय १९ जानेवारीला


एव्हरेस्ट एंटरटेनमेंट प्रस्तुत, राजवारसा प्रॉडक्शन्स आणि मुळाक्षर प्रॉडक्शन्स प्रा. लि. निर्मित ‘सापळा’ हा आगामी मराठी चित्रपट १९ जानेवारी २०२४ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत असून त्याचे पोस्टर नुकतेच एका दिमाखदार समारंभात प्रदर्शित करण्यात आले.


या चित्रपटात चिन्मय मांडलेकर, समीर धर्माधिकारी, दीप्ती केतकर, नेहा जोशी यांच्या भूमिका आहेत. निखिल लांजेकर दिग्दर्शित ‘सापळा’ची कथा श्रीनिवास भणगे यांची असून पटकथा आणि संवाद दिग्पाल लांजेकर यांचे आहेत. चित्रपटाची निर्मिती प्रद्योत प्रशांत पेंढरकर, अनिल नारायणराव वरखडे, दिग्पाल लांजेकर, चिन्मय मांडलेकर यांची आहे. चित्रपटाच्या निर्मितीबाबत बोलताना दिग्दर्शक निखिल लांजेकर म्हणाले, “मला गूढकथा या सर्वांनाच आवडत आल्या आहेत. अशा प्रकारच्या कथा या प्रेक्षकांना नेहमीच अत्यंत प्रभावीपणे भुरळ घालतात. श्रीनिवास भणगे यांची एक अत्यंत प्रभावी आणि जुनी नाट्यसंहितेवर आधारित ‘सापळा’ थ्रिलरपट असून आपल्या मराठी साहित्याची भव्य कक्षा विस्तारणारी ही कथा आजच्या तंत्रज्ञानाची जोड देत मोठ्या पडद्यावर येत आहे.”


दिग्पाल लांजेकर यांच्या समर्थ लेखणीच्या आधारे या कालातीत कलाकृतीची पुनर्निर्मिती केली आहे. पटकथा, संवाद आजच्या प्रेक्षकांना डोळ्यांसमोर ठेवून लिहिले गेलेत. कथेत अत्यंत बारकाईने सुधारणा करून त्यात आधुनिकता आणली गेली आहे की, जेणेकरून ती आजच्या परिस्थितीला साजेशी ठरेल. यातून असा सिनेमॅटिक अनुभव प्रेक्षकांना मिळेल की जो आपल्या समृद्ध अशा कथाकथन परंपरेचा एक नमूना असेल.

Comments
Add Comment

गणपतीची अनेकविध रूपं

डॉ. अंबरीष खरे : ज्येष्ठ अभ्यासक सध्या अवघे समाजमन गणेशोत्सवाच्या तयारीत गर्क आहेत. लवकरच नेहमीच्या उत्साहात

असा झाला गणेशाचा जन्म

महाभारतातील मोतीकण : भालचंद्र ठोंबरे हिंदू संस्कृतीत गणपती या देवतेला सर्वोच्च मान असून गणपती हा विघ्नहर्ता

‘तुमको ना भूल पाएंगे.’

नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे सुमारे ९९ वर्षांपूर्वी पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात जन्मलेल्या श्रीष्टीनाथ

सर्वेपि सुखिनः सन्तु।

संवाद : गुरुनाथ तेंडुलकर आपण ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त झालो, देश स्वतंत्र झाला. हे स्वातंत्र्य

मुलांना चांगल्या सवयी कशा लावाल?

आनंदी पालकत्व : डाॅ. स्वाती गानू लहानपणापासून मुलांना चांगल्या गोष्टी किंवा संस्कार दिल्यास भविष्यात हीच मुलं

प्रथम तुला वंदितो...

मनस्वीनी : पूर्णिमा शिंदे कोणत्याही कार्याची सुरुवात श्री गणेशाच्या पूजेने होते. असा हा पवित्र, मंगलमय,