मुंबई: थंडीचा मोसम हा इतर ऋतूंच्या तुलनेत थोडा आव्हानात्मक असतो आणि यासाठी या मोसमात आपल्या आरोग्याची काळजी घेणे तितकेच गरजेचे असते.
थंडीत आपल्याला असे अन्नपदार्थांचे सेवन केले पाहिजे आपल्या शरीराला आतून उष्णता देतील आणि शरीराला ताकद देतील.
आपण सगळ्यांनी घरातील थोरामोठ्या व्यक्तींकडून बदामाच्या फायद्यांबद्दल ऐकले असेल मात्र आज आम्ही तुम्हाला बदामाच्या अशा फायद्यांबद्दल सांगणार आहोत जे ऐकून तुम्ही लगेचच बदामाचा डाएटमध्ये समावेश कराल.
इम्युनिटी वाढवतात
थंडीच्या दिवसांत इम्युनिटी कमी झाल्याने आजारांचा धोका पटकन वाढतो. त्यामुळे आजार होण्याची भिती असते. मात्र जर तुम्ही नियमितपणे बदामाचे सेवन करत असाल तर तुम्ही आजारांपासून तुमचा बचाव करू शकता.
गुणांची खाण आहे बदाम
बदाम म्हणजे विविध पोषकतत्वांची खाण आहे. यात व्हिटामिन्स, मॅग्नेशियम, प्रोटीन, रायबोफ्लेविन, झिंकसारखे मिनरल्स असतात. दररोज चार ते पाच भिजवलेले बदाम खाल्ल्याने शरीरास जबरदस्त ताकद मिळते.
थंडीत वजन नियंत्रणासाठी फायदेशीर
बदाम हाय फायबर आणि प्रोटीनमुळे वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात. यामुळे मेटाबॉलिज्म वेगात होण्यास मदत होते. यामुळे बराच वेळ पोट भरलेले राहते.
अँटीएजिंग
यात अनेक अँटीएजिंग तत्व असतात जे त्वचेची इलास्टिसिटी अधिक चांगली बनवतात. यामुळे सुरकुत्या कमी होण्यास मदत होते. यातील व्हिटामिन इ मुळे आपले आरोग्य चांगले राहतेच मात्र त्वचा आणि केसांचे आरोग्य सुधारते.
पाचन
थंडीच्या दिवसांत शारिरीक हालचाली कमी झाल्याने पाचनाशी संबंधित समस्या सतावतात. अशातच बदामाचे सेवन पाचनतंत्र सुरळीत ठेवण्यास मदत करतात.
हाडांचे आरोग्य
बदामामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि मोठ्या प्रमाणात प्रोटीन असते. हे हाडांच्या आरोग्यासाठी फायदेशीर अते. याशिवाय थंड हवेमुळे हाडांचे दुखणेही बदामाच्या सेवनाने दूर होऊ शकते.