काळजी घेण्याचं केलं आवाहन
पुणे : कोरोना महामारीमुळे (Corona Pandemic) अख्खं जग थांबलं होतं. देशभरात कोरोनाचे अनेक रुग्ण (Corona patients) सापडल्याने लोकांच्या मनात भीती पसरली होती. यावर आपण विजय मिळवला. मात्र, पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढायला सुरुवात केली आहे. महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी कोरोनाचे रुग्ण सापडत असतानाच आता राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना कोरोनाची लागण झाल्याचे समजत आहे. स्वतः धनंजय मुंडे यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. मात्र, यात घाबरण्याचं काही कारण नसून काळजी घेण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे.
धनंजय मुंडे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, नागपूर अधिवेशन संपल्यानंतर अस्वस्थ वाटू लागल्याने मी तपासणी केली असता पुन्हा एकदा कोविड पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. मला सध्या फारसा त्रास नाही, मात्र डॉक्टरांच्या सल्ल्याने मागील ४ दिवसांपासून क्वारंटाईन राहून योग्य उपचार घेत आहे. काळजी करण्याचे कोणतेही कारण नाही.
नागपूर अधिवेशन संपल्यानंतर अस्वस्थ वाटू लागल्याने मी तपासणी केली असता पुन्हा एकदा कोविड पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. मला सध्या फारसा त्रास नाही, मात्र डॉक्टरांच्या सल्ल्याने मागील 4 दिवसांपासून क्वारंटाईन राहून योग्य उपचार घेत आहे. काळजी करण्याचे कोणतेही कारण नाही.
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) December 24, 2023
मी लवकरच बरा होऊन आपल्या सर्वांच्या सेवेत पुन्हा दाखल होईल. सध्या थंडीचे वातावरण असून कोविडच्या नव्या आवृत्तीने शिरकाव केला आहे. त्यादृष्टीने घाबरून न जाता सर्वांनी आरोग्याची योग्य ती काळजी घ्यावी, असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
मी लवकरच बरा होऊन आपल्या सर्वांच्या सेवेत पुन्हा दाखल होईल…
सध्या थंडीचे वातावरण असून कोविडच्या नव्या आवृत्तीने शिरकाव केला आहे. त्यादृष्टीने घाबरून न जाता सर्वांनी आरोग्याची योग्य ती काळजी घ्यावी.
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) December 24, 2023
नवी दिल्ली, गोवा, गुजरात, कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र, पंजाब, तमिळनाडू, तेलंगणा या राज्यांमध्ये नवीन कोरोना रुग्ण सापडले आहेत. केंद्र सरकारने या राज्यांना अलर्ट मोडवर राहण्याचे निर्देश दिलेले आहेत. त्यामुळे सर्वांनीच आपापल्या आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे.