Saturday, September 27, 2025

Arbaaz Khan: वयाच्या ५६ व्या वर्षी दुसऱ्यांदा बोहल्यावर चढतोय अरबाज खान

Arbaaz Khan: वयाच्या ५६ व्या वर्षी दुसऱ्यांदा बोहल्यावर चढतोय अरबाज खान

मुंबई: सुपरस्टार सलमान खानचा भाऊ अरबाज खान(arbaz khan) वयाच्या ५६व्या वर्षी दुसऱ्यांदा लग्न करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार तो गेल्या काही काळापासून मेकअप आर्टिस्ट शौरा खानला डेट करत होता. त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. आज म्हणजेच २४ डिसेंबरला अरबाज खान आणि शौरा खान लग्न करतील. यासाठी संपूर्ण खान कुटुंबियाची तयारी झाली आहे.

लग्नस्थळी पोहोचले खान कुटुंबीय

अरबाज खानच्या लग्नाचे सर्व विधी बहीण अर्पिता खान हिच्या घरी होतील. लहान भावाच्या लग्नात सामील होण्यासाठी सलमान खान लग्नस्थळी पोहोचला आहे आणि हळू हळू संपूर्ण खान कुटुंबीय अरबाज आणि शौरा खानच्या लग्नासाठी पोहोचत आहेत. रिपोर्टनुसार शौरा आणि अरबाजच्या लग्नात सामील होण्यासाठी रवीना टंडन, मुलगी राशासह सोहेल खान आपल्या मुलासह, अरबाज खानचा मुलगा अरहान खान आणि यूलिया वंतूर लग्नाच्या ठिकाणी पोहोचले आहेत.

अचानक घेतला लग्नाचा निर्णय

टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार अरबाज खान आणि शौरा खान यांनी अचानक लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांना लवकर करायचे होते. अरबाज आणि शौरा यांची भेट पटना शुक्ला या सिनेमादरम्यान झाली होती. दोघांनी आपले नाते गुप्त ठेवले होते आणि लग्नाबाबतही त्यांनी वाच्यता केली आहे.

जॉर्जिया एंड्रियानीसोबत अरबाजचा ब्रेकअप

शौराआधी अरबाज जॉर्जिया एंड्रियानीला डेट करत होता. मात्र त्यांचे नाते दीर्घकाळ टिकले नाही. काही दिवसांपूर्वी जॉर्जियाने अरबाजसोबतच्या ब्रेकअपबाबत भाष्य केले होते. जॉर्जिया एंड्रियानीला डेट करण्याआधी अरबाज आणि मलायका दोघे नवरा-बायको होते. दोघांनी लव्ह मॅरेज केले होते. मात्र काही वर्षांनी त्यांच्या नात्यात कटुता आली. त्यानंतर २०१७मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला. मलायका आणि अरबाज यांचा एक मुलगा अरहान खान आहे.

Comments
Add Comment