ठाणे शहरात पत्नी, दोन मुलांची निर्घृण हत्या करून फरार झालेला आरोपी जेरबंद

ठाणे : कासारवडवली गाव येथील शिंगे चाळीत राहाणाऱ्या अमित धर्मवीर बागडी (२९) हा आपली पत्नी भावना (२४) आणि अंकुश (८) व खुशी (६) या दोन मुलांची हत्या करून पसार झाला होता. त्याबाबत कासारवडवली पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यास काल जेरबंद करण्यात पोलीस शोध पथकास यश मिळाले आहे.


अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ. पंजाबराव उगले पोलीस उपआयुक्त (गुन्हे) शिवराज पाटील व सपोआ (शोध -१) गुन्हे निलेश सोनवणे यांनी गुन्हे शाखेतील घटक ५ वागळे, खंडणी विरोधी पथक, मालमत्ता कक्ष, मध्यवर्ती कक्ष यांचेकडील आठ पथके तयार करून वेगवेगळ्या ठिकाणी रवाना केली होती. या तपास पथकांनी विविध ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेजेस पडताळून तांत्रिक तपास करून आरोपीचा मागोवा घेतला असता हा आरोपी हरयाणात पळून गेल्याची शक्यता वर्तवल्याने गुन्हे शाखा, घटक ५, वागळे, ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांनी सदर ठिकाणी सपोनिरी अविनाश महाजन व पोउपनिरी तुषार माने यांची वेगवेगळी दोन पथके तयार करून तात्काळ रवाना केली होती.


गेलेल्या तपास पथकांनी आरोपीस हिसार, राज्य-हरयाणा येथून चौकशीसाठी ताब्यात घेऊन ठाणे येथे आणले. त्याच्या चौकशीत निष्पन्न झाले की, त्याची बायको दोन मुलांना घेऊन आपल्या भावासोबत ठाणे येथे पळून आली होती. याचा राग आल्याने दोघांमध्ये वाद झाल्यानंतर चिडून बॅटने मारून बायको व मुलांचा खून केला. त्याला आपल्या भावालाही मारायचे होते पण ते त्याला जमले नाही आणि तो तेथून पसारा झाला. या आरोपीला दारूचे व्यसन असून तो बिल्डिंग बांधकामामध्ये बिगारीचे काम करत होता.

Comments
Add Comment

खासदार नारायण राणे यांचा चिपळूण, देवरूख, रत्नागिरीत जनता दरबार

रत्नागिरी: जिल्ह्यातील नागरिकांचे प्रश्न समजून घेण्यासाठी आणि सोडवण्यासाठी रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार

दिवा-चिपळूण मेमू रेल्वे कायमस्वरूपी करण्याचा निर्णय

रत्नागिरी: कोकण रेल्वे मार्गावर दिवा-चिपळूण मेमू रेल्वे कायमस्वरूपी करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे.

साठाव्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांसाठी किंग खानची खास 'भेट'; गाजलेले चित्रपट पुन्हा होणार प्रदर्शित

मुंबई: बॉलिवूडचा 'किंग खान' शाहरुख खान १९९१ मध्ये दिल्लीहून मुंबईत आला आणि त्यानंतर तो थेट करोडो प्रेक्षकांच्या

राम मंदिराच्या दर्शनाची वेळ बदलली , जाणून घ्या अयोध्यातील दर्शनाची वेळ...

अयोध्या : अयोध्येतील श्रीराम मंदिर म्हणजे श्रद्धा आणि भक्तीचा अनोखा संगम. दिवसेंदिवस प्रभू रामाचे दर्शन

लिंबू पाणी प्यायल्यामुळे वजन कमी होते का ? वाचा सविस्तर...

बऱ्याच लोकांना आपला दिवस एक ग्लास लिंबू सरबताने सुरू करणे आवडते. लिंबाचे पाणी शरीराला डिटॉक्स करते आणि पचन

महिलांची हातचलाखी सीसीटीव्हीत दिसली, सोन्याची अंगठी चोरतानाचा व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली: पूर्व दिल्लीतील लक्ष्मी नगरमधील विजय चौक परिसरातील एका ज्वेलरी दुकानात महिलांनी सोन्याची अंगठी