कोल्हापूर : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarang) यांनी राज्य सरकारला २४ डिसेंबरची डेडलाईन दिली आहे. राज्य सरकारने २४ डिसेंबरपर्यंत मराठा आरक्षण दिले नाही तर पुन्हा आंदोलन उभारण्याचा इशारा जरांगे यांनी दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर आता कोल्हापूर प्रशासनाने जिल्ह्यात २४ डिसेंबर ते ७ जानेवारी दरम्यान जमावबंदीचे आदेश (Curfew) जारी केले आहेत.
जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात जमावबंदीचे आदेश काढण्यात आले आहेत. कलम ३७ अ नुसार अप्पर जिल्हा दंडाधिकारी यांनी कोल्हापूर जिल्ह्यात जमाव बंदीचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर जरांगे यांनी राज्य सरकारला २४ डिसेंबरचा अल्टिमेटम दिला होता. त्यानंतर सरकारने शिंदे समिती स्थापन केली. शिंदे समितीने केलेल्या शिफारशीनंतर राज्यभरात ५४ लाख कुणबी नोंदी सापडल्या. आता त्याच अहवालाच्या आधारे येत्या फेब्रुवारीमध्ये विशेष अधिवेशन घेण्यात येणार असून त्यामध्ये मराठा आरक्षणाचा अंतिम निर्णय घेणार असल्याचे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे. मात्र राज्य सरकारची ही भूमिका मान्य नसून २४ डिसेंबर पर्यंत मराठा आरक्षण द्यावं आणि तेही सरसटक द्यावं, अशी मागणी जरांगे यांनी केली आहे.