Friday, October 4, 2024
Homeताज्या घडामोडीमंत्री छगन भुजबळ यांना न्यायालयाने दिलेला जामीन रद्द करावा - मराठा महासंघाची...

मंत्री छगन भुजबळ यांना न्यायालयाने दिलेला जामीन रद्द करावा – मराठा महासंघाची मागणी

जळगाव (प्रतिनिधी)– मंत्री छगन भुजबळ(chagan bhujbal) यांना न्यायालयाने दिलेला जामीन रद्द करावा अशी मागणी २२ डिसेंबर २०२३ रोजी अखिल भारतीय मराठा महासंघाने चाळीसगाव तहसीलदार तसेच चाळीसगाव शहर पोलीस निरीक्षक यांना निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की मंत्री छगन भुजबळ यांना महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात माननीय न्यायालयाने आजारपणाच्या कारणास्तव जामीन मंजूर केलेला आहे. छगन भुजबळ हे घेत असलेल्या जाहीर सभा व त्यांच्या बोलण्यावरून, देहबोली वरून ते कोणत्याही प्रकारे आजारी नसल्याचे सर्व दूर दिसत आहे.

ते सलग एक तास भाषण देत आहे. मंत्री छगन भुजबळ ओबीसीं समाजाच्या सभा घेऊन संविधानिक पदाचा भान न ठेवता ओबीसी व मराठा यांच्यात तेढ निर्माण करण्याचे काम करत आहे. सध्या महाराष्ट्रात मराठा समाजाला आरक्षण मिळावे विविध ठिकाणी सभा आंदोलने मोर्चे सुरू आहेत.

याबाबत महाराष्ट्र सरकार देखील सकारात्मक भूमिका घेऊन आरक्षण देण्याच्या प्रयत्नात आहे. मंत्री छगन भुजबळ यांचा जामीन त्वरित रद्द करावा त्यांना तुरुंगात पाठवावे जेणेकरून दोन समाजात तेढ निर्माण करणार नाही. असे न झाल्यास मराठा महासंघाच्या वतीने लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल अशी मागणी केली आहे

निवेदनावर मराठा महासंघाचे जळगाव जिल्हा संपर्कप्रमुख खुशाल बिडे, कैलास पाटील, नंदकिशोर पाटील, कैलास देशमुख, प्रशांत जाधव, नाना शिंदे, किरण आढाव, दीपक पाटील, राजू बिडे , गोपी स्वार, प्रशांत अमृतकर आदी मराठा बांधवांच्या सह्या आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -