Saturday, July 6, 2024
Homeमहत्वाची बातमीSujit Patkar : संजय राऊतांचे निकटवर्तीय सुजित पाटकरांची सर्व मालमत्ता ईडीकडून जप्त!

Sujit Patkar : संजय राऊतांचे निकटवर्तीय सुजित पाटकरांची सर्व मालमत्ता ईडीकडून जप्त!

तब्बल १२.२ कोटींची संपत्ती घेतली ताब्यात

मुंबई : ठाकरे गटाचे (Thackeray Group) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांचे कौटुंबिक मित्र आणि व्यावसायिक असलेले सुजित पाटकर (Sujit Patkar) सध्या चांगलेच अडचणीत सापडले आहेत. कोविड सेंटर घोटाळा (Covid centre scam) प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने त्यांना ऑगस्ट महिन्यात अटक केली होती. ईडीने (ED) अनेकदा पाटकर यांची चौकशी केली तसेच त्यांच्या घरावरही छापे टाकले. या चौकशीदरम्यान आता ईडीने सुजित पाटकर आणि सहकार्‍यांची सर्व मालमत्ता जप्त करण्याचे ठरवले आहे.

ईडीने काही महिन्यांपूर्वी सुजित पाटकर आणि सहआरोपींविरोधात कोरोना काळातील कोविड घोटाळ्यासंदर्भात गुन्हा दाखल केला होता. त्यात मनीलॉन्ड्रिंगचा (Money Laundering) आरोप पाटकरांवर ठेवण्यात आला होता. आता सुजित पाटकर आणि त्यांच्या सहकार्‍यांची सर्व मालमत्ता ईडीने जप्त करण्याचा निर्णय करण्याचा निर्णय घेतला आहे. म्युच्युअल फंड युनिटस, बँकेची खाती आणि ३ फ्लॅट्स अशी एकूण १२.२ कोटींची संपत्ती ईडी ताब्यात घेणार आहे. तीन फ्लॅट्सपैकी २.८ कोटींचा एक फ्लॅट हा सुजित पाटकरांच्या नावावर असल्याची चर्चा आहे.

सहआरोपींमध्ये राजीव साळुंखे आणि एका महिलेचा समावेश आहे. त्याचबरोबर डॉ. हेमंत गुप्ता यांचा २ कोटी ७० लाखांचा म्युच्युअल फंड जप्त करण्यात आला आहे. सहआरोपींच्या खात्यात असलेले ३ कोटी आणि काही बँक खात्यांमध्ये ठेवलेले ३३ लाख रुपयेसुद्धा ईडीने जप्त केले आहेत. ही सर्व मालमत्ता कोविड घोटाळ्यात कमावल्याचा आरोप ईडीने केला आहे. या तपासात आणखी काय गोष्टी निष्पन्न होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

काय आहेत पाटकरांवरील आरोप?

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आरोप लगावला की पाटकर यांनी देशातील सर्वात श्रीमंत नगरपालिका बीएमसीशी संबंधित कोविड सेंटरमध्ये १०० कोटींचा घोटाळा केला. त्यानंतर ईडीने याप्रकरणामनी लाँड्रिंगच्या प्रकरणात तपास सुरू केला. ईडीने सुजित पाटकर आणि सहआरोपींविरोधात मनी लाँड्रिंगची केस दाखल केली होती. हेल्थकेअर क्षेत्रात कोणताही अनुभव नसताना पाटकर यांना कोरोना महामारीदरम्यान मुंबईत कोविड सेंटर बनवण्याचे काम सोपवण्यात आले असा आरोप करण्यात आला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -