नवी दिल्ली: परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता अरिंदम बागची यांनी गुरूवारी सांगितले की भारतीय नौदलाच्या ८ माजी कर्मचाऱ्यांद्वारे दाखल केलेल्या याचिकेवर कतारमधील न्यायालयाने तीन वेळा सुनावणी केली. माजी कर्मचाऱ्यांनी मृत्यूदंडाच्या शिक्षेविरोधात ही याचिका दाखल केली होती. बागची म्हणाले की भारत त्यांना सकुशलपणे परत आणण्यासाठी काम करत आहे. आठ माजी कर्मजाऱ्यांना गुप्तहेरीप्रकरणी तुरुंगात ठेवले आहे.
अरिंदम बागची यांनी मीडिया ब्रीफिंगमध्ये सांगितले की कतारच्या राजांनी १८ डिसेंबरला देशातील नॅशनल डे निमित्ताने भारतीय नागरिकांसह अनेक कैद्यांना माफ केले. मात्र भारताला हे माहीत नाही आहे की ज्या लोकांना माफी मिळाली आहे त्यांची ओळख काय आहे. याच कारणामुळे हे स्पष्ट होऊ शकलेले नाही की माफी करण्यात आलेल्या लोकांमध्ये भारताच्या या माजी नौदल कर्मचाऱ्यांचा समावेश आहे की नाही.
काय म्हणाले परराष्ट्र मंत्रालय?
हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टनुसार, भारतीय नागरिकांशी संबंधित एका प्रश्नाचे उत्तर देताना अरिंदम बागची म्हणाले, हे प्रकरण आता कतारच्या कोर्टात अपीलमध्ये आहे आणि २३ नोव्हेंबर, ३० नोव्हेंबर आणि ७ डिसेंबरला ही तीन वेळा सुनावणी झाली. यातच दोहामध्ये उपस्थित आमच्या राजदूतांना ३ डिसेंबरला या सर्व लोकांना भेटण्यासाठी काऊंसिलर अॅक्सेस मिळाला.
ऑक्टोबरमध्ये मिळाली मृत्यूदंडाची शिक्षा
कतारच्या न्यायालयाने ज्या आठ भारतीय नागरिकांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे त्यात असे अधिकारी सामील आहेत ज्यांनी भारतीय नौदलात फ्रंटलाईन वॉरशिपवर काम केले आहे. २६ ऑक्टोबरला कतारच्या न्यायालयाने या ८ लोकांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली. शिक्षेआधी यांना कोणत्याही खटल्याशिवाय एक वर्षे ताब्यात ठेवण्यात आले होते. रिपोर्ट्समध्ये या लोकांवर गुप्तहेरी केल्याचे आरोप होते.