नवी दिल्ली : दिल्लीतील उत्पादन शुल्क धोरण प्रकरणी अटकेत असलेले दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया(manish sisodia) यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे. राऊस एव्हेन्यू कोर्टाने पुढील सुनावणीपर्यंत म्हणजे १९ जानेवारी २०२४पर्यंत त्यांच्या कोठडीत वाढ केली आहे.
यामुळे सिसोदियांना तुरुंगात नवीन वर्ष साजरे करावे लागणार आहे.सीबीआय मुख्यालयात कागदपत्रांची तपासणी करण्यासाठी न्यायालयाने १५ जानेवारीपर्यंत वकिलांना वेळ दिला आहे. तपासणी सुलभ करण्यासाठी आणि अनुपालन अहवाल दाखल करण्यासाठी पुरेसे अधिकारी नियुक्त करण्याचे निर्देशही न्यायालयाने सीबीआयला दिले आहेत.